
हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या ग्रंथविक्री स्टॉलवर संमेलनाध्यक्ष फ्रांसिस दिब्रिटो यांच्यावरील आधारित एक पुस्तिका मोफत दिली जात होती. यात आक्षेपार्ह मजकूर होता.
गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळावर आज (ता. १०) उद्घाटनाच्या दिवशी पोलिस आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. संमेलन सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार घडला.
सेतू माधवराव पगडी साहित्यमंचात साहित्यांचे स्टॉल उभारले आहेत. यामध्ये काही आक्षेपार्य पुस्तक विक्री केली जात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'माझीच का चौकशी करीत आहात', असे म्हणत संमेलनातील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे स्टॉलधारक आणि पोलिस यांच्या बाचाबाची झाली. माझा हात धरून घेऊन जात असल्याचा आरोप हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या सदस्यांनी यावेळी केला. संमेलन सुरू होण्यापूर्वीच हा वाद झाल्याने संमेलनस्थळावर वादाचे सावट दिसत आहे.
नेमके काय झाले?
हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या ग्रंथविक्री स्टॉलवर संमेलनाध्यक्ष फ्रांसिस दिब्रिटो यांच्यावरील आधारित एक पुस्तिका मोफत दिली जात होती. यात आक्षेपार्ह मजकूर होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी पुस्तिकेतील मजकुराविषयी स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली. त्यावेळी स्टॉलवरील प्रकाशन संस्थेचे सदस्य आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
आरोप-प्रत्यारोप
पोलिस चौकशी करत असताना प्रकाशन संस्थेचे सदस्य कोलगे यांनी व्हिडिओ चित्रिकरण करीत पोलिसांशी वाद घेतला. पुस्तक विकणे गुन्हा आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे पीएसआय माने यांनी आपण आपले कर्तव्य बजावत आहोत, असे त्यांना सुनावले. दरम्यान, माने यांनी पोलिस उप-अधीक्षक मोतीचंद्र राठोड यांना फोनवरून घडला प्रकार सांगितला. थोड्या वेळाने राठोड यांनीही स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली.
संबंधित बातम्या -
संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार
Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके