सांगा... मतदार संघात काय समस्या आहेत : अमित देशमुखांचा आमदारांशी संवाद

हरी तुगावकर
Tuesday, 14 April 2020

कोवीड १९ व २१ दिवसाच्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हयातील आमदारांशी बाभळगाव येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क सांधला. त्यांच्या मतदारसंघातील सदयस्थितीतील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्वरीत सबंधीत विभागाला तसे निर्देश दिले आहेत. 

लातूर : कोवीड १९ व २१ दिवसाच्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हयातील आमदारांशी बाभळगाव येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क सांधला. त्यांच्या मतदारसंघातील सदयस्थितीतील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्वरीत सबंधीत विभागाला तसे निर्देश दिले आहेत. 

श्री. देशमुख सोमवारी लातूर दौऱ्यावर आले आहेत. या दिवशी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संबंधित सुरू असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. तसेच प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. त्यानंतर सामाजिक अंतर पाळत जिल्हयातील आमदारांशी बाभळगाव येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क सांधला. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

यामध्ये पहिल्या टप्प्यात माजी मंत्री, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संपर्क सांधला. यावेळी जिल्हयात बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तिची तपासणी करूनच गावात प्रवेश द्यावा, जिल्हा बॅक व राष्ट्रीयकृत बॅकाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी. जनतेने मास्क वापरावा यासाठी सक्तीच्या उपाययोजना कराव्यात, कोवीड १९ उपचारासाठी गरज पडल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी, निलंगा तालुक्यात सापडलेले ८ कोरोना रूग्ण लातूर जिल्हयातील नसून अन्य राज्यातील प्रवाशी आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हयात अदयाप एकही कोवीड-१९ रूग्ण सापडला नाही, ही समाधानाची बाब आहे. पुढील काळात अशाच उपाययोजना आखून लातूर जिल्हा कोरोना मुक्त राहील याची दक्षता घ्यावी या संदर्भाने समाधानकारक चर्चा झाली. आगामी काळात म्हणजे खरीप पेरणी वेळी बियाणे तुटवडा होणार नाही याची आता पासूनच काळजी घ्यावी, यावरदेखील यावेळी चर्चा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Deshmukh Interacted With MLAs Latur News