Gram Panchayat Election : अंबड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 60 अर्ज ठरले बाद ; निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब न सादर केल्याने ठरले अवैध

बाबासाहेब गोंटे
Saturday, 2 January 2021

यापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने त्यांना आता पाच निवडणूक लढविता येणार नसल्याचे म्हटले आहे.

अंबड (जालना) : अंबड तालुक्यातील 71 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवार (ता.31) सकाळी अकरा ते तीन या वेळेत अर्जाची छाननी करण्यात आली.

यापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने त्यांना आता पाच निवडणूक लढविता येणार नसल्याचे म्हटले आहे.

मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अंबड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या 627 जागेसाठी गुरुवारी  झालेल्या अर्ज छाननीमध्ये एकूण 60 अर्ज अवैध ठरले आहे. यामध्ये चुरमपुरी 1, वाळकेश्वर 5, डावरगाव 1, रामनगर (अंबड तांडा) 1, साष्टपिंपळगाव 1, बनटाकळी 1, रुई 3, शहापूर 7, पाथरवाला बु./कुरण 2, कवडगाव 1, कर्जत 2,  शहागड 1, कोठाला खुर्द 2, रोहिलागड 1, पारनेर 1, गोविंदपुर 1, ताडहादगाव 1, सुखापुरी 2, गोरी, गंधारी 4, गोंदी 1, नांदी 1, राहुवाडी 3, पावसे पांगरी 3, बनगाव, दहेगाव 2, ढालसखेडा 1, पराडा 2, माहेरभायगाव 1, आलमगाव 2, वलखेडा 1, दहीपुरी 1, भालगाव 3, धनगरपिंपळगाव 1 याप्रमाणे एकूण 60 अर्ज अवैद्य ठरले आहे. असे प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी माहिती दिली आहे. मागील निवडणुकीत खर्चाचा हिशोब सादर न करण्यात आल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अनेकांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे. मात्र निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना चांगलाच दणका दिला आहे. 

हे ही वाचा : दुचाकी घसरुन एक जण गंभीर जखमी ; कचनेर फाटा-पिंर्पीराजा रस्त्यावरील घटना

अंबड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीमधील 627 जागेसासाठी 234 प्रभागात सर्वसाधारण 380, ओबीसी 163, एससी 77, एसटी 8 मिळून 627 जागेसाठी निवडणूक होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Applications for 71 Gram Panchayat elections in Ambad taluka have been scrutinized on Thursday