‘या’ समाजघटकांसाठी शासनातर्फे विशेष ‘समुपदेशकांची’ नियुक्ती

File Photo
File Photo

नांदेड : ‘कोरोना’ विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे बेघर, श्रमिकांना धीर देवून त्यांचे मानसीक व भावनिक समुपदेशन करण्‍यासाठी जिल्ह्यात समुपदेशकांची नियुक्‍ती जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन ईटनकर यांनी एका आदेशाद्वारे शनिवारी (ता.चार २०२०) एप्रिलला करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलांतरीत मजुरांना राहण्‍याची, जेवणाची व्‍यवस्‍था कॅम्‍पमध्‍ये करण्‍यात आली आहे. ‘कोरोना’ विषाणुच्या प्रार्दुभावामुळे बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलांतरीत व्‍यक्‍तींना धीर देण्‍यासाठी मानसीक व भावनिक समुपदेशन करणे आवश्‍यक आहे. यासाठी तालुक्‍यातील बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलातंरीत व्‍यक्‍तींना समुपदेशन करण्‍यासाठी पुढील अधिकाऱ्यांची नियुक्‍ती महत्वाची भूमिका निभावणार आहे.हेही वाचा- दोन हजारांवर महिला बनल्या उद्योजिका, कशामुळे? ते वाचाच
अशी आहेत समन्वयकांची नावांची यादी

समन्‍वय अधिकारी म्हणून नांदेडचे सहायक कामागार आयुक्‍त सयद मौसीन (मो. ७२७६२१६०६६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर समुपदेशक म्हणून हदगाव तालुका गजानन चिंचोलकर (७०३८५०६००८), सुरेश भाऊराव सरोदे (८८३०४५६२२४), मुखेड तालुका शिवकांत बिराजदार (९७६२८८९३६०), गोविंद मुंगल (९४२१८४९३८२), किनवट तालुका प्रदीप लक्ष्‍मण घागळे (-), कविता चिंचाबेकर (९५१८५४०६४३), श्रीमती निरुपा कृष्‍णा राठोड (९४०३२०७४०), नांदेड तालुका श्रीमती सचित्रा भगत (८४८५८१०१८२), साईनाथ मंचेवार (८८८८८३३८३०), बी. पी. जाधव (-), आर. एम. खडके (९५१८५२१६४७), कंधार, लोहा तालुका श्रीमती साधना गणेश एंगडे (८२६१८३२२२७), माधव संभाजीराव डोंपले (९६६५७१११०१) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांनी समन्‍वय अधिकारी व संबंधित तालुक्‍याचे तहसिलदार यांच्याशी संपर्कात राहुन संबंधित कॅम्‍पवर जाऊन संबंधीतांचे समुपदेशन करण्याची कार्यवाही करावी.

आदेशाची अंमलबजावणीबाबत खातरजमा करावी 
समन्‍वय अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी हे त्‍यांना नेमूण दिलेल्‍या तालुक्‍यात जाऊन आदेशाची अंमलबजावणीबाबत खातरजमा करावी. समुपदेशन अधिकारी यांनी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या तालुक्‍यात होत असलेल्‍या कार्यवाहीबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सामान्‍य) प्रसाद कुलकर्णी यांच्याशी समन्‍वय ठेवुन दैनंदिन अहवाल सादर करावा.

सर्व संबंधित अधिकारी यांनी त्‍यांचे दुरध्‍वनी व भ्रमणध्‍वणी क्रमांक सतत चालु ठेवावे त्‍यांना आदेशित केलेली कामे वेळोवेळी २४ तास या पध्‍दतीने सतर्क राहून तत्‍परतेने पार पाडावीत. कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कामामध्‍ये दिरंगाई केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांच्याविरुध्‍द महाराष्‍ट्र कोव्‍हीड-१९ उपाययोजना नियमामधील तरतुद व आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ च्‍या कलम ५१ व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल यांची गांभिर्याने नोंद घ्‍यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
--------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com