आता लालपरी पोचविणार घरी

महेश गायकवाड
Friday, 8 May 2020

लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबे जालना जिल्ह्यात अडकले आहे. या नागरिकांना आपल्या गावी परतण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बसेसची व्यवस्‍था करण्यात आल्याची  माहिती  विभागीय नियंत्रकांनी दिली आहे.

जालना -  कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबे जालना जिल्ह्यात अडकले आहे. या नागरिकांना आपल्या गावी परतण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बसेसची व्यवस्‍था करण्यात आल्याची  माहिती शुक्रवारी (ता.आठ) विभागीय नियंत्रक उद्धव वावरे यांनी दिली आहे.

 लॉकडाउनमध्ये  अडकलेल्या परराज्यातील तसेच राज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर गावी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्‍था नसल्याने अनेकांना खासगी वाहनांचा खर्च न झेपणारा आहे. त्यांमुळे एसटी महामंडळाने राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : परप्रांतीय कामगारांची दैना थांबेना

महाराष्ट्रातील   जे नागरिक जालना जिल्ह्यात  अडकले  आहे. त्यांच्यासाठी जालना विभागामार्फत  एसटी बसेसची व्यवस्‍था करण्यात आली आहे.  आवश्‍यक कागदपत्रे व प्रवास परवाना मिळालेल्या नागरिकांनाच बसने प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा : क्षणार्धात संपले, सोळा मजुरांना रेल्वेने चिरडले 

त्यासाठी नागरिकांना विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना संपर्क करून नोंदणी करावी लागणार आहे. २२ प्रवाशांचा ग्रुप तयार झाल्यानंतर संबंधित ठिकाणी बस सोडण्यात येणार आहे. 

बसने प्रवासासाठी ही कागदपत्रे आवश्‍यक

ज्या नागरिकांना राज्यातील त्यांच्या मुळे जिल्ह्यात परतायचे आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेला प्रवासाचा परवाना आवश्‍यक असणार आहे. हे कागदपत्रे व परवाना मिळाल्यानंतर संबंधित नागरिकांना संबंधित आगार व्यवस्‍थापकांशी संपर्क करून प्रवासासाठी नोंदणी करता येणार आहे.

 
नोंदणीसाठी  आगार व्यवस्‍थापकांचे संपर्क क्रमांक

  • जालना - ०२४८२-२३०३०१,
  • अंबड - ०२४८३-२४५०३४,  
  • परतूर - ९५५२४१७८०८
  • जाफराबाद - ०२४८४-२२२२७०
  • विभागीय वाहतूक अधिकारी जालना - ०२४८२-२२११०२
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement of buses by the st corporation