शेअर मार्केटचे आमिष देऊन ऑनलाईन गंडा घालणारी टोऴी जेरबंद, जालना पोलिसांची कामगिरी 

उमेश वाघमारे
Friday, 30 October 2020

मध्यप्रदेशातून पाच जणांना केले अटक, 
१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना : शेअर मार्केटच्या नावाखाली फेक संकेतस्थळ तयार करून लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणारी अंतराराज्य टोळीला तालुका जालना पोलिसांनी मध्य प्रदेशातील निमुच येथून अटक केली आहे. या पाचही संशयित आरोपींना न्यायायलाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना शुक्रवारी (ता.३०) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुका जालना पोलिस ठाण्यात (ता.१८) ऑक्टोबर रोजी शिक्षक लक्ष्मण मुळे (रा. चौधरीनगर, जालना) यांनी शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोन लाख ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेऊन लुटल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर तालुका जालना पोलिसांनी या टोळीतील काही संशयितांच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन (ता.२७) ऑक्टोबर रोजी एक पथक मध्य प्रदेशातील निमुच येथे दाखल झाले होते. या पथकाने मध्य प्रदेशातील निमुच येथून गणेशकुमार कैलासचंद्र केवट (वय२४) उमेश जगदीश गौर (वय२३), मानसिंग रामदयाल गुजर (वय२३) तिघेही (रा. कंवला, ता. भानुपुरा, जि. मंदसौर), श्रीकांत देवकीसंजीत मिना (वय २२, रा. सांजलपुर, ता. भानुपुरा, जि. मंदसौर) व हन्नी मंगल तोतला (वय२३, रा. बेगपुरा जावद, ता. जावद,जि. निमुच, मध्यप्रदेश) यांना अटक केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या टोळीकडून दोन संगणक, एक हार्डडिस्क, दोन वायफाय राउटर, १२ मोबाईल, १५ डेबिटकार्ड, आठ विविध बँकांचे चेकबुक, एक कारसह कच्चा नोंद वह्या असे एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून (ता.२९) ऑक्टोबर रोजी जालना येथे हे पथक दाखल झाले. तसेच या टोळीचे बॅंक खात्यातील पाच लाख रुपये फ्रिज करण्यात आले आहेत. या टोळीने संपूर्ण देशामध्ये शेकडो लोकांची फसवणुक केल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान तपासादरम्यान आतापर्यंत २२ लोकांच्या मोबाइल क्रमांक पोलिसांना या टोळीकडून मिळाले आहेत. त्यामुळे सायबर क्राईमव्दारे या टोळीने अनेकांना टोप्या घातल्याचा संशयित असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी सांगितले आहे. दरम्यान ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, साहय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, कर्मचारी किशोर तराळ, बालाजी पितळे, प्रताप जारवाल, अशोक राऊत, सागर बाविस्कर यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असा केला जात होता संपर्क

या टोळीकडून मोबाइलवर संपर्क करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधीक पैसे मिळतील असे आमिष दाखविले जात होते. यासाठी या टोळीकडून www.moneygrowthsolution.comwww.redinvestore.com हे दोन संकेतस्थळ ही निर्माण करण्यात आले होते, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested online gangsters for luring stock market jalna news