सहायक सरकारी वकीलाला लाच घेताना अटक

हरी तुगावकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

लातूर: येथील जिल्हा न्यायालयातील सहायक सरकारी वकील अनुराधा शिवाजीराव झांपले (वय ४७) यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. सात) अटक केली आहे.

लातूर: येथील जिल्हा न्यायालयातील सहायक सरकारी वकील अनुराधा शिवाजीराव झांपले (वय ४७) यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. सात) अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ः येथील जिल्हा न्यायालयात एका तक्रारदाराचे पक्षकाराच्या विरोधात चालू असलेल्या खटल्यात तारीख वाढवून हवी होती. यासाठी सहायक सरकारी वकील अडीच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराला केली. त्यानंतर या तक्रारदाराने येथील लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसाशी संपर्क साधला. गुरुवारी (ता. सहा) पोलिसांनी याची पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. सात) जिल्ह्या न्यायालयातील वकिल कार्यालयात पोलिसांनी सापळा लावला. यात पोलिसांनी सहायक सरकारी वकील अनुराधा झांपले यांना अटक केली आहे. अडीच हजार रुपये जप्तही केले आहेत. या करीता पोलिस उपअधिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार दराडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Arrested while taking bribe at latur