
दिग्दर्शक सुनील देवरे यांनी प्राण ओतून निर्माण केली कलाकृती
औरंगाबाद : एखाद्या शिल्पकलाकाराने निर्मिलेल्या विश्वात पंचविशीतील उमद्या तरुणीने प्रवेश करावा. त्याने साकारलेले विविध शिल्प आशाळभूत नयनांनी पाहतच राहावे. त्या शिल्पाला नाजूक, हळुवार स्पर्श केल्यानंतर या निर्मीत शिल्पातही स्वतःत्वाचा शोध घ्यावा. आपली हुबेहुब प्रतिमा साकारावी हेच जणू तिच्या नयनांतून व्यक्त व्हावे. मग मंद पावले टाकीत एक एका शिल्पावर तिची नजर भिरभिरावी अन् नयन अलगद लागताना शिल्पकार यावा आणि त्याने तिचे शिल्प साकारण्यासाठी सरसावावे. अशी सुरुवात असलेला ‘मुरत’ हा लघूपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात पोचला आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
संवाद नसतानाही केवळ भावनांनी ओतप्रेत भरलेली आशाळभुत नजर, शिल्पकाराचा कटाक्ष, आणि कलेविषयीची बांधिलकी आणि अभिजात बंदीशवरच हा लघुपट सुरुवात करतो व थांबतो. ‘ती’चे शिल्प साकारताना व ते सजीव व्हावे यासाठी प्राणही ओततानाची कलाकराची ती मुद्रा भावविभोर करते. तहान, भूक विसरुन शिल्पकार त्याच्या शिल्पनिर्मितीतच रममाण असतो. त्याच्यासाठी केवळ तेच जग असते. शिल्पानेच शिल्पकाराच्या प्रेमात पडावे; हलकासा ओठाने स्पर्श करावा हे अत्युच्च काल्पनिक क्षणही या लघूपटात चित्रित केले गेले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सुनील देवरे हे प्रतिभावंत शिल्पकार आहेत. त्यांनी ‘मुरत’ लघुपटाचे दिग्दर्शन केले असुन अॅक्टींगही केली आहे. त्यांच्यासोबत लघुपटात कलाकार ऋतूजा गांवकर यांनी काम केले. संगीत व गायन ज्येष्ठ गायिका आरती पाटणकर, संपादन गुंजन लोकरे, सिनमॅटोग्राफी समीर कानगुटकर यांनी केली. ‘सिनेक्युस्ट फिल्म अॅन्ड व्हीआर फेस्टीव्हल्स’, लेब्यू इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, बोरड्यूक्स लॅटीन अमेरिकन फिल्म, इन द पॅलेस इंटरनॅशनल शार्टफिल्म या महोत्सवात हा लघूपट दाखविला जाणार आहे. युट्यूबवरही हा लघुपट अपलोड झाला आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अभिजात बंदीश गुंतवूण ठेवणारी
लघूपटात ‘मेरे सावरिया बाजू बंद खुल-खुल जाये’ ही अभिजात बंदीश आहे. शेकडो वर्षांपासून ही अभिजात बंदीश अनेक गवय्ये गात आले आहेत. ही बंदीश ज्येष्ठ गायिका आरती पाटणकर यांनीही खुबीने गायली. लघूपट ऐकताना त्यांच्या जादूई, कर्णमधूर स्वर व संगीतात श्रोता- दर्शक पुर्णतः बुडून जातो.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोण आहेत सुनील देवरे
सुनील देवरे औरंगाबादेतील असून त्यांचे शिक्षण येथेच स्कुल ऑफ आर्ट व त्यानंतर मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्ट या संस्थेत झाले. त्यांना दिल्लीतील इंदीरा गांधी फाऊंडेशन अवार्डसह अनेक पुरस्कार प्राप्त असुन त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या.