esakal | येथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

भारत देश ‘कोरोना’च्या व्हायरसने चिंताग्रस्त झाला आहे. देशात व राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढु नये म्हणून विविध खबरदारीच्या उपायोजना राबविल्या जात आहेत. शासकीय कर्माचारी यांच्यात समांतर अंतर ठेवण्यासही सुरुवात झाली. मात्र, नांदेडच्या एसटी कार्यशाळेतील कर्मचारी मात्र अद्यापही असुरक्षितच कर्तव्य बजावत आहेत.


येथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची वाट

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के कर्मचारी कपात केली. याची सर्वच शासकिय कार्यालयात अमलबजावणी सुरु असतानाच सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर जाणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, नांदेड एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील ७० ते ८० कर्मचाऱ्यांना अजुनही आदेश न मिळाल्याने नोकरी जाईल या भितीपोटी कामावर हजर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे.

वरिष्ठांच्या आदेशाची वाट 
राज्य शासन ऐकीकडे कोरोना रोखण्यासाठी तासा तासाला नवीन आदेश काढुन लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहे. मात्र, दुसरीकडे नांदेडच्या एसटी कार्यशाळेतील कर्मचारी स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षेविषयीची साधने पुरविलेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे कर्मचारी काम करीत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असून, संघटनाही वरिष्ठांच्या आदेशाची वाट बघत आहेत.

 हेही वाचा-  Video : नांदेडकरांनो सावधान, जिल्ह्यात १४४ कलम लागू- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

वरिष्ठांची दिरंगाई
मुंबईच्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरुन कार्यशाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर आदेश मिळत नसल्यानेच कर्मचाऱ्यांना नेहमी प्रमाणे दाटीवाटीने कामे करावी लागत आहे. नुकतेच शासनाने शासकीय व खासगी कारखाण्यात केवळ पाच टक्केच कर्मचारी यांना कार्यालयात प्रवेश देण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र, नांदेडच्या एसटी महामंडळ वर्कशॉप मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून अद्यापही नवीन आदेश प्राप्त झालेले नाहीत. वरिष्ठांच्या दिरंगाईमुळे सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) रोजी एसटी महामंडळाच्या वर्कशॉप मध्ये ८० पेक्षा अधिक कर्मचारी नाईविलाजाने काम करत असल्याचे दिसून आले.

हेही वाचले पाहिजे -  Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा

 

पाच टक्केच काम सुरु ठेवायचे याबद्दल निर्णय घेण्यात येणार
शासनाचा आदेश असला तरी, आम्हाला वरिष्ठांकडून कुठलेही आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे कामगार कायद्याप्रमाणे काम सुरु असून, आदेश प्राप्त होताच त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे किंवा पाच टक्केच काम सुरु ठेवायचे याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.
श्री. पन्हाळकर (यंत्रअभियंता)

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याशिवाय काहीच करता येणार नाही

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्फत सर्व सुचनांचे पालन अथवा कर्यवाही सुरु आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वर्कशॉप मधिल कामगारांना सुट्टी देण्यात आली नसली तरी, त्यांच्यावर काय ॲक्शन घ्यावी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याशिवाय काहीच करता येणार नाही.
- अविनाश देशमुख (सहाय्यक जिल्हा कामगार अधिकारी)