महाराष्ट्रात सीएएला विरोध करणार- अशोक चव्हाण

file photo
file photo

नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकास या देशात राहण्याचा अधिकार आहे. परंतु भाजपने मात्र जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करुन अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. सीएए सारखा संविधानविरोधी कायदा राज्यात लागू होवू देणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात मागील सहा दिवसांपासून सर्वपक्षीय बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची उपस्थिती होती.

कॉंग्रेसचा तिव्र विरोध

अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, देशामध्ये जेव्हा सीएए  कायदा केवळ पाशवी बहुमतांच्या बळावर पारित करण्यात आला तेव्हाच काँग्रेसच्यावतीने श्रीमती सोनिया गांधी यांनी तीव्र विरोध दर्शविला.या कायद्यामुळे देशामध्ये आराजकता वाढणार आहे. विशिष्ठ धर्मियाना ‘टार्गेट’ करण्यासाठीच भाजपाने हे दोन्ही कायदे मंजूर करुन घेतले आहेत. लोकसभेमध्ये जरी भाजपाला बहुमत असले तरी अशा निर्णयामुळे जनतेत मात्र त्यांच्याविषयी मत चांगले राहिलेले नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यशासनाचे मनुष्यबळ आवश्यक असते. राज्यशासनाच्या सहमतीशिवाय अशा कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये जरी तीन पक्षाचे सरकार असले तरी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष समर्थपणे विरोध करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पाशवी बहुमतांचा गैरवापर 

निवडणुकांच्यावेळी योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते. काँग्रेस पक्ष व जिल्हयातील अल्पसंख्य समाज यांचे अतुट असे नाते आहे. मुस्लिम समाजाच्या सुख-दुखामध्ये आम्ही नेहमी सहभागी असतो. इदगाह मैदानावर हस्तांलोंदन करुन शुभेच्छा देणारे जिल्ह्याचे खासदार या प्रश्नावर मूग गिळून का बसले आहेत? असा सवाल करतानाच आपल्या मताचा कोण  कोणत्या कारणासाठी वापर करुन घेतो याची जाणिव यानिमित्ताने सर्वानिच ठेवणे आवश्यक आहे. भाजपासारख्या धर्मांध व जातीवादी पक्षाना पाठबळ देण्याचे काम इतर काही राजकीय पक्ष व समाज घटकांकडून होत असते. त्यामुळेच केवळ मतविभाजणाच्या जोरावर भाजपाला संसदेमध्ये पाशवी बहुमत मिळाले आहे. या पाशवी बहुमतांचा गैरवापर करत सीएएसारखे संविधान विरोधी कायदे मंजूर केल्या जात आहेत याची जाणिव आपणास असली पाहिजे असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी मुफ्ती आयुब कासमी आदींची सीएएविरोधी भाषणे झाली. सूत्रसंचालन अ‍ॅड. शाहेद यांनी केले. यावेळी माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, मसूद खान, शमीम अब्दुल्ला, मुंतजीब, शेरअली, महमद नासेर, अ. लतिफ, हबीब बागवान, हफीज बागवान, हबीब मौलाना, डॉ.अर्शिया कौसर, बाबू खोकेवाले, अब्दुल गफार आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com