शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यावर बीडमध्ये जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

या तिघांच्या तावडीतून निसटलेल्या राहुल यांनी तातडीने शहर ठाणे गाठले. त्यांच्या पोटात व डोक्यात दुखापत झाली आहे. निरीक्षक वासुदेव मोरे यांनी त्यांना रुग्णालयात पाठविले.

बीड : येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर गुरुवारी (ता.16) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सारडा नगरी परिसरात शस्त्राने हल्ला झाला. हल्लेखोरांच्या तावडीतून निसटून त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले.

राहुल फरताळे असे हल्ला झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते युवासेनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी दुपारी दुचाकीवरुन (क्र.एमएच 44 एम-4042) घराकडे येत असताना, सारडा नगरीसमोर आल्यानंतर अचानक तिघांनी त्यांना अडविले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला.

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

या तिघांच्या तावडीतून निसटलेल्या राहुल यांनी तातडीने शहर ठाणे गाठले. त्यांच्या पोटात व डोक्यात दुखापत झाली आहे. निरीक्षक वासुदेव मोरे यांनी त्यांना रुग्णालयात पाठविले.

मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गर्दी करुन फरताळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या प्रकरणी राहुल फरताळे यांनी रात्रीपर्यंंत जवाब दिला नव्हता. त्यामुळे गुन्हा नोंद झाला नव्हता. जवाब नोंदविल्यानंतर गुन्हा नोंद करुन अधिक तपास केला जाईल, अशी माहिती निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिली. 

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault On Shivsena Leader In Beed Marathwada News