esakal | मुख्यमंत्री सहायता निधीला सराफा असोसिएशनकडून मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

श्री संत पाचलेगावकर महाराज मठ संस्थान आणि नांदेड जिल्हा सराफा असोसिएशनच्या वतीने सुधाकर टाक यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख २२ लाख २२२ रुपयांची मदत करण्यात आली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे, तर मठ संस्थानकडून उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाख यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला.

मुख्यमंत्री सहायता निधीला सराफा असोसिएशनकडून मदत

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील एक महिन्यापासून सर्वच उद्योग - व्यवसाय आणि बाजारापेठा लॉकडाउनमुळे बंद आहेत. लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर सर्वच क्षेत्रांत आशादाई वातावरण निर्माण झाले होते. दिलासादायक चित्र वाटत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ता. तीन) मे २०२० पर्यंत लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची घोषणा केली. आता तीन मेनंतर तरी लॉकडाउन काढून घेतले जाणार, की यात भर पडणार, याबद्दल अजून तरी निश्चित असे काहीच नाही.

कोरोनामुळे अनेक देश गंभीर संकटात सापडले आहेत. यात महाराष्‍ट्र सरकारलादेखील अनेक आरोग्य सांधनांची व साहित्यांची अवश्यता आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास हजारो नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. यात नांदेड सराफा असोसियशनदेखील पुढे आली आहे.

हेही वाचा- धक्कादायक : नांदेडमध्ये कोरोना बाधीत पहिला रुग्ण

यांची उपस्थिती
सराफा असोसिएशनच्या वतीने नुकतीच कोरोनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक बोधने, सचिव सुधाकर टाक धानोरकर, कोषाध्यक्ष सुरेश सोमानी, सहसचिव पांडुरग येरावार, सदस्य नितीन शेवडकर व कैलास टाक धानोरकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा-  अन्नधान्य संपले; पण दारू काही संपेना !

मुख्यमंत्री निधीस पाचलेगावकर महाराज आश्रमाचाही हातभार

नांदेड: श्री संत पाचलेगावकर महाराज मठ संस्थान हे नेहमीच सामाजिक कार्यात योगदान देत आले आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या वतीने नुकतेच एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस करण्यात आली.

आश्रमाचे अध्यक्ष सुधार टाक व विश्वस्त श्रीमती गयाबाई लांगे यांनी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाख यांच्याकडे एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी चंद्रभान पाटील जवळेकर, सतीश किन्हाळकर, रुपेश टाक व दत्तोपंत डहाळे यांची उपस्थिती होती.

 
loading image