वसमत तालुक्यातील चौंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery
वसमत तालुक्यातील चौंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न

वसमत तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न ; चोरट्यांकडून फायर

शिरड शहापुर : वसमत तालुक्यातील चोंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank) तीन चोरट्यांनी शुक्रवारी ता.१४ साडेचार वाजता लुटण्याचा प्रयत्न केला. पंरतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद दिली नसल्याने चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरट्यांनी बँकेच्या काचेवर दोन राऊंड फायर(two round fire) केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही काच फुटल्याने रोखपाल जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील चोंढीआंबा येथील टी पाँईटवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे . शुक्रवारी द व्यवहार आटोपून बँकेचे अधिकारी इशान खिस्ते , रोखपाल नितीन ननवरे व सेवक भद्रदीप सरोदे हे काम करीत होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून तिघे जण बँके समोर आले. त्यापैकी दोघे जण बँकेत शिरले तर एक जण बँकेबाहेरच थांबला.यावेळी बँकेत गेलेल्या दोघांनी हातातील बंदूक दाखवून इशान खिस्ते यांना धमकावून बँकेत काय आहे ते देण्याबाबत दरडावले. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न दिल्याने चोरट्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. बँकेतून जातांना चोरट्यांनी दोन राऊंड फायर केले. राऊंड चॅनल गेटला लागल्यामुळे कुठलीही हाणी झाली नाही पंरतु बँकेची काच फुटून लागल्याने रोखपाल ननवरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहेत.

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख , उपाधिक्षक किशोर कांबळे कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-मुजाहेद सय्यद

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BankMarathwadarobbery
loading image
go to top