esakal | विनापरवाना उत्खनन; औरंगाबादेतील दोन कंन्स्ट्रक्शन कंपन्यांना कोट्यावधीचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad.jpg

विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन आणि एस. बी. इंजिनिअर्स या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी ही कारवाई केली आहे.

विनापरवाना उत्खनन; औरंगाबादेतील दोन कंन्स्ट्रक्शन कंपन्यांना कोट्यावधीचा दंड

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन आणि एस. बी. इंजिनिअर्स या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी ही कारवाई केली आहे.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   


याबाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद ते बेंबळी-उजनी या रस्त्याच्या विस्ताराचे काम एस. बी. इंजिनिअर्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने या रस्त्याच्या कामासाठी ११ हजार ५०० ब्रास गौणखनीज उत्खनन करण्याची परवानगी कंपनीने घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र कंपनीने ३४ हजार ४९३ ब्रास एवढे गौन खनीजाचे उत्खनन केले आहे. म्हणजेच सुमारे २२ हजार ९९३ ब्रास एवढे गौन खनीजाचे विना परवाना उत्खनन केले आहे. ही गौन खनीजाची चौरी असून याची रक्कम दंडासह वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद तहसीलदारांना दिले आहेत. शुक्रवारी (ता. १९) हे आदेश काढले आहेत.

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.


 तसेच कळंब ते लातूर या रस्त्याचे काम औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्‍ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने २१ हजार ५०० ब्रास एवढे गौन खनीज उत्खनन करण्याचा परवाना घेतला असून ३९ हजार ५६९ ब्रास खनीजाचे उत्खनन केले आहे. म्हणजेच १८ हजार ६९ ब्रास गौन खनीजाचे जास्तीचे उत्खनन केले आहे. विनापरवाना शासनाच्या गौन खनीजाचे उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक आदेश काढून वसुलीची कारवाई करावी, असे आदेश कळंब तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

कोट्यावधीचा महसूल तिजोरीत जमा होणार
एस. बी. इंजिनिअर्स या कंपनीने २२ हजार ९९३ ब्रास एवढे गौण खनीज उत्खनन केले आहे. जेव्हा विनापरवाना उत्खनन केले जाते. तेव्हा प्रचलित दराच्या पाचपट दराने वसुली केली जाते. म्हणजेच एका ब्रासला २४०० रुपये दराने वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे एस. बी. इंजिनिअर्स कंपनीकडून पाच कोटी ५१ लाख ८३ हजार २०० रुपये वसुली होणे अपेक्षित आहे. तर ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन कंपनीने १८ हजार ६९ ब्रास गौनखनिज विनापरवाना उत्खनन केले आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून चार कोटी ३३ लाख ६५ हजार ६०० रुपये एवढी रक्कम वसुल करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.