esakal | औरंगाबाद पदवीधर निवडणूक : ८१३ मतदान केंद्रे, ३ लाख ७४ हजार ४५ मतदार!
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक.jpg

मराठवाडा विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी विभागात ८१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

औरंगाबाद पदवीधर निवडणूक : ८१३ मतदान केंद्रे, ३ लाख ७४ हजार ४५ मतदार!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद  : मराठवाडा विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी विभागात ८१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण ३ लाख ७४ हजार ४५ मतदार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


विभागात सर्वाधिक १०६३७९ मतदार तर सर्वाधिक २०६ मतदान केंद्रे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. सर्वात कमी १६७६४ मतदार आणि सर्वात कमी ३९ मतदान केंद्रे हिंगोली जिल्ह्यात आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा मतदार संख्या   मतदान केंद्र 


  • औरंगाबाद   १०६३७९   २०६  

  • जालना        २९७६५     ७४ 

  • परभणी       ३२६८१      ७८ 

  • हिंगोली       १६७६४     ३९ 

  •  नांदेड         ४९२८५   १२३  

  •  बीड        ६४३४९      १३१   

  • लातूर         ४११९०      ८८ 

  • उस्मानाबाद  ३३,६३२   ७४ 
  •  
  • एकूण : ३ लाख ७४ हजार ४५  ८१३

(संपादन-प्रताप अवचार)

loading image