Aurangabad : धुक्यामुळे कांद्याचे पीक धोक्यात

भेंडाळा मंडळातील चित्र ः बळिराजाला फवारणीमुळे आर्थिक झळ
Aurangabad
Aurangabadesakal

कायगाव : गंगापूर तालुक्यातील जामगाव, भेंडाळा महसूल मंडळ परिसरात मंगळवारी (ता.९) दुपारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर रोज पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पीक धोक्यात आले आहे. कांदा, गहू, ज्वारी पिकांसह फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळिराजाला फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत असल्याचे चित्र आहे.

Aurangabad
Winter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसायचंय? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये या प्रकारच्या शालचा करा समावेश

गोदावरी नदी काठच्या गाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणात वेगाने बदल होत आहे. या परिसरात आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी रात्री देखील हलका पाऊस झाला. हिवाळ्यातील गारव्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवले.अवकाळी पावसाच्या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराई पसरत असून कांदा, गहू, हरभरा पीक धोक्यात आले आहे. परिसरातील गव्हावर तांबेरा तर ज्वारी व कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. करप्यामुळे कांद्याची फुगवण क्षमता कमी होऊन उत्पादन घटणार असल्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

Aurangabad
Beauty Tips : चेहरा गोरापान अन् काळी कुळकुळीत मान, हे घरगुती उपाय करा,नक्की फरक पडेल

शेतकरी हवालदिल

जामगाव महसूल मंडळ आणि भेंडाळा महसूल मंडळ परिसरात खराब हवामानाचा मोठा फटका कांदा पिकास बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. ढगाळ व खराब हवामान तसेच रिमझिम अवकाळी पाऊस यामुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रोगट हवामानामुळे कांदा पिकांवर करपा, मावा, बुरशी व मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगामुळे शेतकऱ्याला कांदा पिकावर औषध फवारणी करावी लागणार आहे.

-चंद्रशेखर परभणे पाटील, शेतकरी, भेंडाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com