esakal | साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २६ कोटी रुपये जमा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत लाभ होणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ७५१ शेतकरी या कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.

साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २६ कोटी रुपये जमा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. यात आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ६०० शेतकऱ्यांच्या खात्यात २६ कोटी ३८ लाख २८ हजार २४२ रुपये बुधवारपर्यंत (ता.४) जमा केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. 

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत लाभ होणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ७५१ शेतकरी या कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पूर्णत्वास येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील यादीत सिल्लोड व पाचोड (ब्रु) या दोन गावांची निवड केली होती. पहिल्या यादीत तीन हजार ६०० शेतकऱ्यांचा समोवश होता. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. 
असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

बँकेचे नाव शेतकरी संख्या  प्राप्त रक्कम 
जिल्हा मध्यवर्ती बँक       ५७७ ९२,००००० 
अलाहाबाद बँक         ३६ ३४,९५,९४३
अॅक्सिस बँक          १ १,३३,५६३ 
बँक ऑफ बडोदा        २०८ १६,३८,३५४७
बँक ऑफ इंडिया         १७१  १३,५२,१७७४ 
बँक ऑफ महाराष्ट्र       ७३७ ६४,४७,४१२१
कॅनरा बँक        २४ १,३०,०७६३
सेंट्रल बँक ऑफ इंडिया         १६८ १४,११,२९२८ 
कॉर्पोरेशन बँक         १  १,४१,९२१ 
एचडीएफसी बँक            १ १,०७,७१० 
आयसीआयसीआय बँक           ६८ ९२,४५,८२१ 
आयडीबीआय बँक           ४० ४३,६८,२२०
कर्नाटका बँक-          १  १९,८०३९ 
महाराष्ट्र ग्रामीण बँक        ५३९ ४,५८,५५,६३२ 
ओबीसी बँक         २ १४,९१४० 
पंजाब नॅशनल बँक          ३२  २,६३,२९९५ 
स्टेट बँक ऑफ इंडिया        ९६७ ७,६४,७२,३३५
युनियन बँक ऑफ इंडिया         २७ २०,३३,७९० 
एकूण       ३६०० २६,३८,२८,२४२ 
loading image