esakal | औरंगाबादेत आज नवे ३५० रूग्ण, अँटीजीन चाचणीत ९१ पॉझिटीव्ह, चार मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शहरात व प्रवेशद्वारावर घेण्यात आलेल्या अँटेजीन चाचणीत ९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात शहराच्या प्रवेशद्वारावर ३० आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने घेतलेल्या चाचणीत ६१ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यात आज १६८ जणांना सुटी देण्यात  आली.

औरंगाबादेत आज नवे ३५० रूग्ण, अँटीजीन चाचणीत ९१ पॉझिटीव्ह, चार मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत एकीकडे लॉकडाऊन सुरु असुन चौथ्या दिवशीही कोरोना विषाणुचा संसर्ग वाढीचा वेग जलदच आहे. आज (ता. १३) जिल्ह्यात ३५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

यात शहरातील २९५ व ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार २२९ बरे झाले आहेत. जिल्ह्यातील ३५८ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला. ३ हजार २२७ जणांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा- औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

अँटीजीन चाचणीत आढळले ९१ पॉझिटीव्ह -

शहरात व प्रवेशद्वारावर घेण्यात आलेल्या अँटेजीन चाचणीत ९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात शहराच्या प्रवेशद्वारावर ३० आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने घेतलेल्या चाचणीत ६१ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यात आज १६८ जणांना सुटी देण्यात  आली. यात शहरातील १२२  व ग्रामीण भागातील ४६ जणांना सुटी देण्यात आली. 

कोरोना मीटर -
बरे झालेले रुग्ण - ५२२९
उपचार घेणारे रुग्ण - ३२२७ 
एकूण मृत्यू - ३५८
-------------------------
आतापर्यंत बाधित - ८८१४

औरंगाबादेत आणखी चौघांचे मृत्यू

औरंगाबाद ः औरंगाबादेत कोरोना व इतर व्याधींनी दोघांचे बळी गेले. यात दोन पुरुष असुन दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत औरंगाबादेत ३५८ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

सिडको एन-सहा येथील ४९ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात दोन जूलैला भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणी  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा बारा जुलैला रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. 

छावणी, मिलिंद महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या ७६ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात २९ जुलैला भरती करण्यात आले. ३० जूलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाझिटीव्ह आला. त्यांचा १२ जुलैला रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना डायबेटीक नेफ्रोपॅथी व उच्च रक्तदाब होता.

खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील ४९ वर्षीय पुरूष तसेच अन्य एका खासगी रुग्णालयात ४५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

loading image