53 आमदार, खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)

water scarit  Meeting News
water scarit Meeting News

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी रविवारी (ता.2) सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मराठवाड्यातील केवळ 11आमदारांनी हजेरी लावली. तर उर्वरित विधानसभा व विधानपरिषदेच्या 44 आमदार व नऊ खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.यामूळे पाणी प्रश्‍नावर अजुनही लोकप्रतिनिधी उदासिन असल्याचे या बैठकीतून दिसून आले. 

आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून मराठवाड्यातील पाणी प्रश्‍नासाठी 2011 पासून सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. समन्यायी पाणी वाटप, अनेक प्रश्‍न मार्गीही लागले आहे. मराठवाड्यात 150 टीएमसीची पाण्याची तुट भरून निघण्यासाठी आवश्‍यक असलेले कृष्ण मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्प, वॉटरग्रीड आणि पश्‍चिम वाहन्यातील समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पास गती मिळावी यावर चर्चा झाली. याच संदर्भात येत्या 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुख्यमंत्र्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आमदार प्रशांत बंब यांनी दिली. प्रामुख्याने या बैठकीत भाजपचे मराठवाड्यातील आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर, नारायण कुचे हे दहा आणि शिवसेनेचे एकमेव आमदार संजय सिरसाट उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीस आतापर्यंत झालेल्या पाच बैठकीसही एवढा लोकप्रतिनिधीचा आकाडा राहिला आहेत. तिच परंपरा यंदाही कायम होती. 

बैठकीत विद्यार्थ्यांचा गोंधळ 
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीच्या बैठकीत विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व आर.आर.पाटील फाऊंडेशन व सम्यक विद्यार्थी संघटनेशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी बैठकीत येत मराठवाड्यावर होणाऱ्या सातत्याने अन्याय विरोधात घोषणाबजी केली. एवढे नव्हे तर दुष्काळ,शेतकरी आत्महत्या यासह विविध प्रश्‍नावर आमदारांना जाब विचारला. एवढे नव्हे तर बाकी आमदार का आणले नाही, त्यांची जबाबदारी तुमची नव्हती का? आतापर्यंत बैठकीतून काय मिळाले यावर आमदार विचारणा केली. यामूळे बैठकी आमदार विरुद्ध विद्यार्थी असा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

यांनी फिरवली पाठ 
मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अनुपस्थित होते.

अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्न तरतूद करणार 
यातला पाणीप्रश्न गंभीर मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा टॅंकरवाडा अशी विशेषणे लागली. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्न तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचे या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com