esakal | दीड लाख शेतकऱ्यांना ६३३ कोटींची कर्जमुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ७५१ शेतकरी या कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत

दीड लाख शेतकऱ्यांना ६३३ कोटींची कर्जमुक्ती

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. यात शनिवारपर्यंत(ता.२८) जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ३७८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६३३ कोटी ६२ लाख ४ हजार रुपये जमा केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहेत.

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ७५१ शेतकरी या कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पूर्णत्वास येत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. २८ मार्चपर्यंत १ लाख ५१ हजार ३१० खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. यासह १ हजार २४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९२२ निकाली काढण्यात आल्या आहेत. तर ३१८ निकाली काढण्यात येत आहेत. यासह जिल्हायातील सर्व तहसिलदाराकडे १ हजार २२९ तक्रारी आल्या आहेत. त्यपैकी ७०२ निकाली लागल्या आहेत. तसेच ५२७ निकाली काढण्यात येत असल्याचेही जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बँकेचे  नाव शेतकरी संख्या प्राप्त रक्कम 
जिल्हा बँक- ९५३७० २१३६३२२९५५
अलाहाबाद बँक ७६२ ७०५६५०१७ 
आंध्रा बँक ४  २६९२७१
अॅक्सिस बँक ११ १४८५९०३ 
बँक ऑफ बडोदा ३१३७ २४१८८४९२०
बँक ऑफ इंडिया २५४२ २०११९६०३७
बँक ऑफ महाराष्ट्र १२१८४ १०१९९७९८४६
कॅनरा बँक २५२ १५९०७२७३
सेंट्रल बँक ऑफ इंडिया २५१७ १९३२८१३६७ 
कॉर्पोरेशन बँक ३१ ५०२७०८४ 
फेडरेल बँक- १७३२१६ 
एचडीएफसी बँक ३२ ३५३४८८१ 
आयसीआयसीआय बँक  २१८ ३००९०२०५
आयडीबीआय बँक  ८०९ ७९४३२८४६ 
इंडियन बँक १५३५०८ 
इंडियन ओरियसिस बँक १४७५६७ 
जालना जिल्हा मध्यवर्ती बँक ११३२८०
कर्नाटका बँक ३२७२०९
महाराष्ट्र ग्रामीण बँक १०५६२ ८७३१५७४३५ 
ओबीसी बँक २४  १८३६७२५
पंजाब नॅशनल बँक ३५० २७२५८०४९ 
आरबीएल ५०७५९७ ​
स्टेट बँक ऑफ इंडिया ८१२८ १३९६४१५४३६ 
सिंडीकेट बँक- ३६०४७१ 
युनियन बँक ऑफ इंडिया ४१८ ३६६१३६८१ 
युनाटेड बँक आँफ इंडिया ३६६१३६८१ 
अन्य बँक - ५२००८- ४१९९८८१४६८
एकूण १४७३७८ ६३३६२०४४२३ 

loading image