....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका | Abdul Sattar Comment On Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका

औरंगाबाद : स्वतः पाच वर्ष मुख्यमंत्री होते. तरी औरंगाबादचा पाणीप्रश्न सुटला नाही, असा सवाल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाचा समाचार प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार यांनी घेतला. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. त्यावेळी पाण्याची आठवण आली नाही का? (Abdul Sattar Says, Jal Akrosh Morcha Of Devendra Fadnavis In Aurangabad Is Political Driven)

हेही वाचा: शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस

हा पाण्याचा मोर्चा नाही. तो राजकीय मोर्चा आहे, असा टोला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका आल्या म्हणून मोर्चा काढला जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर केला आहे.

हेही वाचा: Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून आक्रोश मोर्चाची तयारी जोरात सुरु होती. या मोर्चावर शिवसेनासह एमआयएमकडून टीका केली जात आहे.

Web Title: Abdul Sattar Says Jal Akrosh Morcha Of Devendra Fadnavis In Aurangabad Is Political Driven

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top