औरंगाबाद : विदेशातून शहरात आले एक हजार प्रवासी

७७१ जण निगेटिव्ह, ५६ जणांचा शोध लागेना
abroad From city Aurangabad one thousand came traveler
abroad From city Aurangabad one thousand came travelersakal

औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona) ओमीक्रॉन विषाणूच्या (Omicron virus) पार्श्‍वभूमीवर विदेशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. एक डिसेंबरपासून शहरात एक हजार ४० प्रवासी दाखल झाले आहेत. त्यांची चाचणी केली असता ७७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आला असून, ५६ जणांचा शोध लावण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

abroad From city Aurangabad one thousand came traveler
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची सक्तीने कोरोना चाचणी केली जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, विदेशातून शहरात दाखल झालेल्या एक हजार ४० प्रवाशांपैकी बाहेरगावी गेलेले ३१ जण असून, दुबार नावे असलेले २० प्रवासी आहेत. महापालिकेच्या वॉररूममधून त्यांच्याशी संपर्क साधला असता १०७ प्रवाशांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच ५६ प्रवाशांचा शोध लागलेला नाही. दरम्यान एक प्रवासी ओमीक्रॉन निघाला असल्याने संबंधिताला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ३३ मुलांचा समावेश आहे. या मुलांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. तसेच ५४ प्रवाशांची कोरोना चाचणी सात दिवसांनी केली जाणार असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

abroad From city Aurangabad one thousand came traveler
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

त्या दोघी होम क्वारंटाईन

औरंगाबाद शहरातील रहिवासी व सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या एका कुटुंबातील तरुणीला ओमिक्रॉनची लागण झाल्याने तिच्यावर मुंबईतच उपचार सुरू करण्यात आले. तिची आई व बहिण शहरात आली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनचा अवधी संपल्याने दोघींना घरी सोडण्यात आले असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com