esakal | तब्बल २६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बोलून बातमी शोधा

null

तब्बल २६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: स्फोटक कायद्यासह इतर गुन्ह्यात २६ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने मंगळवारी (ता.२७) बेड्या ठोकल्या. प्रविण विजयकुमार बोरसे (४९, रा. साईनाथनगर, बीड बायपास) असे त्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बोरसेविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने त्याला सापळा लावत अटक केली.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

बोरसेविरोधात १९९४ साली गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. न्यायालयाने बोरसेविरोधात समन्स काढत सदर खटला डॉर्मंट स्थितीवर ठेवून आरोपीला फरार घोषीत केले होते. आरोपीला अटक करुन जवाहनगर पोलिसांच्या हवाली केले.

हेही वाचा: Corona Updates: काळजी घ्या! मराठवाड्यात २४ तासांत १७१ जणांचा मृत्यू

ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक पवन इंगळे, प्रभात म्हस्के, सचिन घुगे, नितीन धुळे यांनी केली.