esakal | Corona Updates: काळजी घ्या! मराठवाड्यात २४ तासांत १७१ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

Corona Updates: काळजी घ्या! मराठवाड्यात २४ तासांत १७१ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनाबाधित १७१ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (ता. २८) झाली. त्यात औरंगाबादेत ३७, लातूर २९, नांदेड २४, जालना २२, बीड १९, परभणी १८, हिंगोली-उस्मानाबादेत प्रत्येकी ११ जणांचा समावेश आहे.

दिवसभरात सात हजार ४९७ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येमध्ये बीड १३४६, औरंगाबाद १३१४, लातूर १२०३, परभणी १०३७, उस्मानाबाद ८७२, जालना ८१६, नांदेड ७६९, हिंगोली १४०.

हेही वाचा: 'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करणे ही राज्याची जबाबदारी'

औरंगाबाद जिल्ह्यात ३७ जणांचा मृत्यू झाला. त्यात घाटीत २४, जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन, खासगी रुग्णालयातील ११ जणांचा समावेश आहे. खुलताबाद येथील महिला (वय २०) गंगापूर मेहबूबखेडा येथील महिला (६५), गणेशनगर, गारखेडा येथील महिला (४५), वाळूजमधील व्यक्ती (३५), हडको एन-१२ मधील महिला (५५), लिहाखेडीतील महिला (७३), रायपूर-गंगापूर येथील पुरुष (७०), बोरसर वैजापूर येथील महिला (६०), सेंट्रल नाका भगातील पुरुष (५५), वाळूज एमआयडीसी भागातील पुरुष ( ५१), ढोरकीनमधील पुरुष (३५), दुधड, करमाडमधील पुरुष (६५), चिंचोलीतील पुरुष (५२), लिहाखेडी येथील महिला (६०), उपला-कन्नड येथील पुरुष (७०)

दाभरूळ पैठण येथील पुरुष (६०), धानोरा फुलंब्री येथील महिला (५८), कबीरनगरातील महिला (७०), रेणुकानगरातील महिला (६५), पिशोरमधील पुरुष (६६), तीसगाव येथील महिला (६६), काडेठाण बुद्रुक येथील महिला (७०), समर्थ कॉलनीतील महिला (६९), बापूनगरातील पुरुषाचा (३८) घाटीत मृत्यू झाला. सोयगावातील महिला (६०) बीड बायपास भागातील पुरुषाचा (७३) जिल्हा सामान्य रुग्णालयात तर वैजापुरातील पुरुष (७८) , जांभरगावातील पुरुष (७९), कांचनवाडीतील पुरुष (६९), सिडको एन-दोनमधील महिला (८०), रामनगरातील महिला (६०), अब्दीमंडी भागातील पुरुष (४७), अंगुरीबाग भागातील पुरुष (४५), सिडको एन-७ मधील पुरुष (३९), सातारा परिसरातील पुरुष (५४), सातारा परिसरातील महिला (५०), म्हाडा कॉलनीतील पुरुषाचा (८०) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

हेही वाचा: क्रिकेटवर सट्टा, ११ जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबादेत दीड हजार रुग्ण कोरोनामुक्त-

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात एक हजार ३१४ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ५३० तर ग्रामीण भागातील ७८४ रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णसंख्या एक लाख २१ हजार ८८० वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी एक हजार ५१० जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख सात हजार १५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १२ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान चोवीस तासांत ३७ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या दोन हजार ४६४ वर पोचली आहे.

loading image
go to top