Jalna News : अपघातामुळे जलवाहिनी फुटली मालवाहू ट्रक व्हॉल्व्हवर उलटला ; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

गुजरातहून हैदराबादला प्लॅस्टिक साहित्य घेऊन जाणारा भरधाव मालवाहू ट्रक जालना पाणीपुरवठा पाईपलाईनच्या ''एअर व्हॉल्व''वर उलटला.
jalna
jalnasakal

पाचोड : गुजरातहून हैदराबादला प्लॅस्टिक साहित्य घेऊन जाणारा भरधाव मालवाहू ट्रक जालना पाणीपुरवठा पाईपलाईनच्या ''एअर व्हॉल्व''वर उलटला. यामुळे झालेल्या अपघातानंतर पाइपलाइनला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यालगत थेरगाव (ता.पैठण) जवळील पुलानजीक शनिवारी (ता.२०) दुपारी साडेतीन वाजता घडली.

जालना शहराची तहान भागविण्यासाठी आठ वर्षापूर्वी अडीचशे कोटी रुपये खर्चून पैठणच्या धरणातून थेट वीस मीमी व्यासाची पाइपलाइन पाचोड-पैठण रस्त्यालगत टाकण्यात आली. शनिवारी (ता.२०) गुजरातहून ट्रक (क्र. केए ५६ - ६२६२) प्लॅस्टिक साहित्य घेऊन भरधाव वेगात पैठण-पाचोड रस्त्याने हैदराबादला जात असताना थेरगाव (ता.पैठण) जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत असलेल्या जालनाला पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनच्या ''एअर व्हॉल्‍ह’वर आदळली.

jalna
Jalna News : जालना जिल्हा हिवताप अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने पकडले

यामुळे काही समजण्यापूर्वीच जमिनीतून व्हॉल्वचा पाइप तुटून बाजूला झाला. पाण्याच्या वेगाने ट्रकमधील पंचवीस किलो वजनाच्या असलेल्या प्लॅस्टिक दाण्याने भरलेल्या गोण्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागल्या. एअर व्हॉल्व तुटून नदी जोमाने वाहून नदीला मोठा पुर आला. हे पाणी दहा-वीस किलोमीटरपर्यंत दूर वाहत गेले. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत जालना नगरपालिका प्रशासनाने पाइपलाइन जोडणीची तसदी घेतली नाही.

त्यामुळे लाखो लिटर पाणी नदीने वाहत होते. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पसार होण्यात धन्यता मानली. या ट्रकमध्ये स्वयंपाकाचा गॅस होता, तो ट्रक उलटून मध्यभागातून तुटून बाजूला झाला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाण्याची नासाडी नित्याचीच

लिंबगाव, हर्षी, दावरवाडी तलाव, राहटगाव, नानेगाव शिवारातील व्हॉल्‍हमधून अहोरात्र हजारो लिटर पाणी वायाला जातानाचे चित्र नित्यनियम पाहावयास मिळाले. पाण्याची होणारी नासाडी व अपव्यय टाळण्यासाठी जालना नगर पालिका असमर्थ ठरत असल्याचे पाहून घोटभर पाण्यासाठी आसुसलेल्या स्थानिक नागरिकांनी पाण्याचा अपव्यय पाहून रोष व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com