esakal | जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरीत पाण्याचा विसर्ग | Jayakwadi Dam Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या सर्व दरवाजातून गोदापात्रात सोडण्यात आलेले पाणी.

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरीत पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी (Jayakwadi Dam) प्रकल्पाच्या नाथसागरातील बुधवारच्या (ता.२९) रात्री पाणलोटक्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरु झाल्यामुळे नाथसागराचे एकुण सर्व २७ वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. रात्री अकरा वाजता धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला. धरणात ९८.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे गोदावरीच्या (Godavari River) पात्रात पाणी पाणीच झाले असुन दोन्ही (Paithan) काठाच्या बाहेर हे पाणी वेगाने आले आहे. या वाढत्या पाणी परिस्थितीवर धरण व तालुका प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवले आहे. धरणाची एकुण पाणीपातळी १५२२ फुट असुन सध्या ही पाणी पातळी १५२१. ७५फुट झाली आहे. यापुढे (Aurangabad) पाण्याचा धरणात जोर वाढल्यास धरण धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या जिवंत पाणीसाठा २१४१ दशलक्ष घनमीटर असुन पाण्याची आवक ४० हजार ३१८ क्यूसेक आहे.

हेही वाचा: पिक नुकसानीचा धसका घेत शेतकऱ्याचा मृत्यू, मुलीचे लग्न राहिले

धरण निर्मितीच्या काळापासून नाथसागर २२ वेळा भरले असुन या काळात अनेक वेळा पुर व महापुराच्या परिस्थितीला पैठणकरांना तोंड द्यावे लागले होते. तसेच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले होते. विशेष बाब म्हणजे १९७५मध्ये धरणाचे काम सुरु असतांना पुर आला होता. त्यामुळे चालु कामात धरणातुन जवळपास ४० हजार क्युसेक पाणी गोदापात्रात सोडावे लागले होते अशी माहिती सुत्रांनी दिली.

पाण्याचा धोका असुन ही संरक्षण भिंत नाही!

दरम्यान, नाथसागराची निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार ही बाब शासनाला माहित असताना शासनाने पैठणकरांच्या संरक्षणासाठी गोदाकाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम गेल्या ४० वर्षांत हाती घेतले नाही. त्यामुळे शासन याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. संरक्षण भिंत कधी बांधणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी

loading image
go to top