प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींच्या विरोधात देश पातळीवर मजबूत आघाडीची गरज

0prakash_ambedkar_32
0prakash_ambedkar_32

औरंगाबाद : देशपातळीवर मोदी लाट रोखण्यासाठी मजबूत आघाडी झाली पाहिजे. त्यात काँग्रेसला नेतृत्वहीन पद्धतीने सहभागी करुन घेता येईल, लोक कॉग्रेसच्या मागे जात नाही हे बिहार निवडणुकीने दाखवून दिले आहे. तेजस्वी यादव, ममता, पटनायक, किंवा अन्य कुणीही या विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.काँग्रेसने आता स्वतःचे चारित्र्य तपासण्याची गरज आहे. बिहारमध्ये ७० जागा घेतल्या त्यापैकी केवळ १९ जागा निवडून आल्या त्यामुळे आता कॉंग्रेसला बाजूला ठेवून देशपातळीवर आघाडी झाली तर मोदींना रोखणे अवघड नाही असे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. बुधवारी (ता.११) वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. हिंदुत्व हा मुद्दा आता बाजूला पडत आहे. एकलकोंडी राजकारणाच्या प्रयत्नाला छेद मिळाला, हे बिहार निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.तेजस्वी यादव यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून ज्या परिस्थितीत त्यांनी ते मिळवले ते देखील महत्त्वाचे आहे. आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी रोखण्यासाठी मजबूत आघाडीची गरज आहे. या आघाडीचे नेतृत्व कुणीही करावे. शरद पवारांचे नाव पुढे करण्याचे कारण नाही, मी देखील आँल इंडिया स्तरावरचा नेता आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

निवडणूका पुढे ढकलणे चुक
मनपा आणि ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या मात्र असे करता येत नाही, राज्यात किंवा देशात कुठलीच निवडणूक पुढे ढकलणे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. अगदी भारत-पाकिस्तान, बांग्लादेश किंवा चीन सोबत युद्ध सदृष्य परिस्थिती असली तरीही निवडणुका या वेळेवरच झाल्या पाहिजे. निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. त्यासाठीही घटनेमध्ये बदल करावे लागतील असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर
वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदार संघासाठी औरंगाबादला प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ, पुणे साठी प्रा. सोमनाथ जनार्धन साळुंखे आणि नागपूरसाठी राहुल महादेवराव वानखेडे यांच्या नावाची घोषणा केली. तर पुणे शिक्षक मतदार संघासाठी प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे यांना उमेदवारी दिल्याचे ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com