Ambadas Danve : अपघातग्रस्त महिलेच्या मदीतीला धावून आले दानवे, स्वत: केली मलमपट्टी

Ambadas Danve
Ambadas Danve

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर रस्त्यावर आपल्या पतीसोबत मोटार सायकलने प्रवास करत असलेल्या एका महिलेचा गाडीवरून पडून अपघात झाला. दरम्यान यावेळेसच येथून जात असलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची मदत केली.

अंबादास दानवे यांनी अपघात ग्रस्त महिलेला झालेल्या जखमेवरती त्यांच्या गाडितील असलेल्या प्रथमोपचार बॉक्समधून प्राथमिक उपचार केला. दानवे यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये अंबादास दानवे महिलेचा अपघात झाल्याचे बघताच गाडीतून खाली उतरले. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकांना पाणी आणायला सांगितले. तसेच महिलेच्या हाताला व पायाला जखम झाली होती. यावेळी त्यांनी स्वत: मलमपट्टी केली.

Ambadas Danve
Barsu Refinery : ग्रामस्थांनी घातलं सरकारचं श्राद्ध! मुंडन केलं, बोंबा मारल्या; म्हणाले आम्ही जिवंत असेपर्यंत...

अंबादास दानवे यांची जमिनीशी नाळ जोडून असलेला नेता म्हणून ओळख आहे. विरोधी पक्षनेते असले तरी ते आपला ग्रामीण वृत्ती विसरत नाहीत.

Ambadas Danve
Nitesh Rane : 'नितेश राणे हे भाजपचा नाच्या आहेत', राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची जहरी टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com