esakal | Ambedkar Jayanti 2020 बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाने  बहरलाय सोशल मीडीया 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

-डॉ. आंबेडकर जयंतीची यंदा ऑनलाईन धूम 
-भीमगीते, प्रश्नमंजुषा अन् स्पर्धांचेही आयोजन 

Ambedkar Jayanti 2020 बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाने  बहरलाय सोशल मीडीया 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे यंदा प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घराबाहेर निघता येणार नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर बाबासाहेबांच्या जयंतीची धूम आहे. कधी नव्हे एवढा विक्रमी प्रतिसाद सोशल मीडियावर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिळत आहे. व्हॉटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम, हँलो असा साराच सोशल मिडीया यंदा गजबजून गेला आहे. 
सोशल मीडीयावर द. बोधिसत्व पेज, ब्ल्यु माँर्नींग लाईव्ह पेज, नागसेन फेस्टीव्हल पेज, प्रबुद्ध भारत पेज यासह असंख्य पेजेस सुरु झाले आहेत. मूकनायक ते प्रबुद्ध भारत अशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, टिकटॉक व्हिडीओ स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र सेना आँनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धा घेत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

नागसेन फेस्टीव्हल पेजतर्फे पीडीएफ स्वरुपातील गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, हिंदू कोडबिल, रिडल्स इन हिंदुझम, थॉटस ऑफ पाकिस्तान, शूद्र कोण होते, प्रॉब्लेम ऑफ रुपीज अशा विविध पुस्तकांबरोबरच बाबासाहेबांच्या विविध क्षेत्रातील माहिती देणारे लेख, ग्राफिक्स पाठविणे, दिवंगत कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांची माहिती, विविध दुर्मिळ छायाचित्र पाठवणे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रबुद्ध भारत फेसबुक पेजवर १४ एप्रिलरोजी सकाळी ९ वाजता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे आपले मत मांडणार आहेत. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शाहीर मेघानंद जाधव, दुपारी १२ वाजता लोकगायिका कडूबाई खरात, दुपारी ३ वाजता रॅपर विपीन तातड आणि टीम, सायंकाळी ५ वाजता सूर नवा ध्यास नवा फेम अमोल घोडके, सायंकाळी ६ वाजता ‘भीमराव जबरदस्त’ फेम राहुल साठे तर सायंकाळी साडे सात वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ स्टार प्रवाह फेम विनल देशमुख तसेच रात्री ९ वाजता 'मी वादळवरा' फेम अनिरुद्ध विणकर यांचे कार्यक्रम होणार आहेत. प्रबुद्ध भारत या पेजवरुन डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे, संगितकार तेजस चव्हाण, प्रिती तेजस या संचाचा गाणी आणि घरातील जयंती, उत्सव बहुजन नायकांचा, जोतिबा-भीमरावांचा हा गीतांचा कार्यक्रम आँनलाईन होत आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध ऑनलाईन पेजेस सुरू करण्यात आलेले आहेत. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो अशा विविध माध्यमांवर प्रश्नमंजुषा, भीम गीत गायन स्पर्धा, बाबासाहेबांच्या माहिती सांगणाऱ्या पुस्तकांच्या पीडीएफ कॉपीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

loading image