Anemia Disease : मुलींसह मुलांमध्येही ‘अॅनिमिया’; वेळीच लक्ष द्या

हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी ः अॅनिमियामुक्तीसाठी ‘मैत्री क्लिनिक’
Anemia
Anemiasakal

Chh. Sambhaji Nagar News : मुलगी भविष्यात निरोगी माता व्हावी, यासाठी शासनातर्फे किशोरवयीन मुलींसाठी किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. किशोरवयीन मुलींसोबत मुलांमध्येही वाढत्या अॅनिमियाचे प्रमाण लक्षात घेता मुला-मुलींमध्ये लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जात आहे.

याअंतर्गत दर आठवड्याला आयर्न व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दुपारच्या जेवणानंतर दिल्या जातात, जेणेकरून दोन ते तीन महिन्यांत त्यांच्या रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. भारतातील ६० ते ७० टक्के स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण भागासोबत शहरी महिलांमध्येही याचे प्रमाण लक्षणीय आहे.

५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. लोहाची कमतरता असल्याने मुलगी मातेच्या भूमिकेत जाते, त्यावेळी फटका बसतो. गरोदर माता मृत्यू होण्यामध्ये अॅनिमिया महत्त्वाचे कारण आहे.

यात वेळेआधी प्रसुती होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे असे विपरीत परिणामही जाणवतात. सुदृढ पिढीसाठी किशोरवयीन मुलींच्या तपासण्यांसोबत त्यांच्यातील अॅनिमिया दूर करण्यासाठी उपचारही होत आहेत. यादरम्यान, मुलांमध्येही लोहाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले.

मुलांमध्ये लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालयात ‘विकली आयर्न फॉलिक अॅसिड’ गोळ्या देण्यात येत आहेत. हा उपक्रम सुरू केल्यापासून मुलांमुलीमधील लोहाची कमतरता भरून निघण्यास सुरवात झाली आहे.

मासिक पाळीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व

मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न ठेवल्यास जननमार्गात जंतुसंसर्गाचा धोका असतो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय पथकातर्फे प्रत्येक शाळेमध्ये प्रबोधन शिबिर घेतले जाते. तसेच स्वच्छतेचे प्रशिक्षणही दिले जाते.

‘मैत्री’ क्लिनिकद्वारे समुपदेशन, उपचार

किशोरवयात शरीरातील बदलांमुळे मुलामुलींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. याची माहिती नेमकेपणाने त्यांना मिळत नाही. लैंगिक शिक्षण देण्यासोबतच समुपदेशनासाठी जिल्ह्यातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रे,

१० ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी मैत्री क्लिनीकची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्लिनीकमध्ये १० ते १९ वयोगटातील किशोर मुला- मुलींचा आरोग्य समस्यांचे निराकरण व उपचारही करण्यात येते.

Anemia
Anemia Free Campaign : संतुलित आहार घ्या; रक्तक्षय टाळा

अॅनिमियाची कारणे

  • लोहयुक्त आहाराची कमतरता,

  • सकस आहाराची कमतरता

  • मानसिक तणाव

  • मासिक पाळीतील रक्तस्राव

  • जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )

  • वारंवार गर्भपात

  • मलेरिया

  • जंत

  • मूळव्याध

Anemia
Anemia : वयाच्या चाळीशीनंतर महिला का होतात अ‍ॅनिमियाची शिकार?, जाणून घ्या कारणे

ॲनिमियाची लक्षणे

  • आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिकट पडतो.

  • नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.

  • चक्कर येणे

  • भूक मंद होणे

  • चालताना दम लागणे

  • थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे

  • निरुत्साह वाढतो

  • चिडचिडेपणा वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com