Ashadhi Wari
Ashadhi WariEsakal

Bakri Eid: 'यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही', छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांचा निर्णय

आषाढी वारी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने घेतला मोठा निर्णय
Published on

'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण भक्तिमय झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. यावर्षी एकाच दिवशी बकरी ईदसुद्धा साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय संभाजीनगरमधील वाळूज भागातील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. (Latest Marathi News)

विठुनामाचा गजर करत दिंड्या पताका घेऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या गुरुवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.(Latest Marathi News)

Ashadhi Wari
Politics: मविआ सोबत भाजपला धक्का! बडा नेता 'बीआरएस'च्या वाटेवर? केसीआर'यांची घेतली भेट

यंदा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम एकाच दिवशी होत आहे. मात्र बकरी ईदला होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेतला जात आहे.(Latest Marathi News)

Ashadhi Wari
Devendra Fadnavis : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तिथं गंभीर घडलं असं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com