औरंगाबाद : सेवेचा कार्यकाळ संपुष्टात आलेल्या राज्यातील पोलिस अधीक्षक, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील ४१ उपायुक्तांच्या तर १२० सहायक पोलिस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबादेतील शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
तर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपविभागीय अधिकारी विवेक सराफ यांची शहर पोलिस आयुक्तालयाच्या सहायक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच सांगली, तासगाव येथील अशोक बनकर हे नव्याने सहायक पोलिस आयुक्त म्हणून पोलिस आयुक्तालयात दाखल होणार आहेत.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील ही पोलिस अधिकाऱ्यांचा या बदली आदेशात समावेश आहे. यामध्ये उस्मानाबाद जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपअधीक्षक सचिन सावंत यांची नवी मुंबई येथे सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कंसात सध्याचे ठिकाण, तर बाहेर नविन नियुक्तीचे ठिकाण
पोलिस अधिकारी - सध्याचे ठिकाण - बदलीचे ठिकाण
(संपादन-प्रताप अवचार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.