ATM Fraud Case: १ कोटी १६ लाखांचा एटीएम घोटाळा उघड; चार वर्षे पसार असलेले सहा जण अखेर पोलिसांच्या जाळ्यात
Cash Loading Scam: छत्रपती संभाजीनगरातील एटीएममध्ये कमी रक्कम भरून उर्वरित पैसे स्वतःकडे ठेवण्याच्या १ कोटी १६ लाखांच्या घोटाळ्यातील सहा जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. ऑडिटमध्ये फसवणूक उघड झाल्यानंतर मार्च २०२२ मध्ये नोंदलेल्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सर्व संशयितांना पकडले.
छत्रपती संभाजीनगर : एटीएममध्ये पैसे भरताना ठरलेल्या रकमेऐवजी कमी रक्कम भरून उरलेले पैसे परस्पर स्वतःजवळ बाळगत होते. या प्रकरणात मार्च २०२२ मध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.