औरंगाबादेत मोठा अपघात ! दोन ऊसतोड मजूर ठार, पाच गंभीर जखमी

मुलीचा अपघातात मृत्यू झाला, तर नातवाचा पाय मोडला. होत्याचे नव्हते झाले.
Aurangabad Accident
Aurangabad Accidentesakal

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला आयशर धडकून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी पाच वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील धानोरा फाटा येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून बारामती येथे आयशरमध्ये (एमएच 20 ईएल7638) ऊस तोडणीसाठी मजूर निघाले होते. धानोरा (Sillod) फाट्यानाजीक रस्त्याच्या कडेला टिप्पर (एमएच 20 सीटी 1613) उभा होता. भरधाव वेगाने सिल्लोडकडे (Aurangabad) येत असलेल्या आयशर चालकाने उभ्या टिप्परला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये कल्पना यमजी पवार (वय 40, रा.मोहाडी, ता.पाचोरा) व प्रशांत विठ्ठल वाघ (वय 36, रा.हनुमानवाडी, ता.माळशिरस, जि.सोलापूर) यांचा मृत्यू झाला. तर निलेश यमजी पवार (वय 12, रा.मोहाडी, ता.पाचोरा), रुखमाबाई किसन पवार (वय 60), सागर किसन पवार (वय.20), अनिल गंगाराम पवार (वय 28, सर्व रा.पाचोरा) व सुभाष इंदर राठोड (वय 32, रा.मध्य प्रदेश) हे जखमी झाले. (Accident In Aurangabad)

Aurangabad Accident
'गोबर रिपब्लिक'मध्ये राहता, महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या

अपघातानंतर सर्व जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी रामेश्वर जाधव, संतोष घुनावत यांनी घटनास्थळी पाहणी करीत उपजिल्हा रुग्णालय गाठले.

वडिलांचे अश्रू अनावर

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघात घडलेल्या वाहनातील मजूर घाबरलेल्या अवस्थेत बसले होते. अपघातात मृत झालेल्या कल्पना पवार यांच्या वडिलांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सांगितले की, काही समजण्याच्या आयशर धडकून मोठा आवाज झाला. ऊस तोडणीसाठी फलटण येथील कारखान्याला चाललो होतो, मुलीचा अपघातात मृत्यू झाला, तर नातवाचा पाय मोडला. होत्याचे नव्हते झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com