esakal | धक्कादायक ..कोरोनाबाधित ज्येष्ठ महिला आली होती 26 जणांच्या संपर्कात 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

तेरा एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचे स्वॅब चाचणीचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल सोळा एप्रिलला प्राप्त झाला. त्यांची कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला मधुमेह, रक्तदाब, डायबेटीज नॅफ्रोपॅथी (मधुमेह मूत्रपिंडाचा आजार) आजार आहे.

धक्कादायक ..कोरोनाबाधित ज्येष्ठ महिला आली होती 26 जणांच्या संपर्कात 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - शहरातील बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिला रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सारीची रुग्ण म्हणुन तेरा मार्चपूर्वी त्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या; गंभीर बाब म्हणजे त्या २६ जणांच्या संपर्कात आल्या असून, त्यांचा आणखी कुणाशी संपर्क आला का, हे तपासले जात असल्याची माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी ‘सकाळ’ला दिली. या महिलेची प्रकृती गंभीर असून, घाटीत उपचार सुरू आहेत. 

डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले, की तेरा एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचे स्वॅब चाचणीचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल सोळा एप्रिलला प्राप्त झाला. त्यांची कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला मधुमेह, रक्तदाब, डायबेटीज नॅफ्रोपॅथी (मधुमेह मूत्रपिंडाचा आजार) आजार आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, ६५ वर्षीय महिला सारीची रुग्ण म्हणुन तेरा एप्रिलपूर्वी त्या एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या रुग्णालयात काहीजणांच्या संपर्कात आल्या होत्या. आतापर्यंत ती २६ जणांच्या संपर्कात आल्या असून, हिस्ट्री घेतली जात असल्याचेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

५६ अहवालांची प्रतीक्षा 

जिल्हा रुग्णालयाला १३ कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. गुरुवारी (ता.१६) या अहवालांपैकी उर्वरित १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ५६ अहवालांची प्रतीक्षा असल्याचेही जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. 

तो अभियंता १४ नंतरही पॉझिटिव्हच 

जिल्हा रुग्णालयात आरेफ कॉलनीतील ३८ वर्षीय कोरोनाबाधित अभियंत्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा चोवीस तासांच्या अंतराने दोन स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हेाते. त्याचा अहवाल गुरुवारी (ता. १६) प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे या अभियंत्यावर पुन्हा उपचार सुरूच राहतील, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, या अभियंत्याच्या ६८ वर्षीय वडिलाचा दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

loading image