सलून, पार्लर बंद करण्याच्या आदेशाची होळी; नाभिक बांधव आक्रमक

Aurangabad Breaking News
Aurangabad Breaking News

औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नाभिक महामंडळ व अखिल भारतीय जिवा सेनेने तीव्र विरोध दर्शवत या आदेशाची सोमवारी (ता.पाच) होळी केली. मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून उपासमारीची वेळ आली होती.

आता कुठे तरी गेल्या दोन महिन्यापासून सलून व्यवसाय सुरळीत होत असताना पुन्हा एकदा दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान सलून व पार्लर बंद करण्याच्या आदेशाची नाभिक महामंडळाच्या वतीने होळी करण्यात आली. यावेळी विष्णू वखरे, नवनाथ घोडके, संभाजी वाघ, अप्पासाहेब दळवी, संजय औटे, सुदाम पंडित, सोमनाथ दळवी, मोहन वाघ, कृष्णा ठाकरे, सागर वाघ, अशोक ठाकरे, शांतीलाल जंगम, संतोष मगर, अक्षय बेलकर उपस्थित होते. प्रशासनाने रविवारी सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. आम्ही कोरोना नियमाचे नेहमी प्रमाणे काटेकोर पालन करू अशी विनंती नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com