औरंगाबादेत ३६ तासांत कोरोनामुळे तीन जणांचा बळी, एकुण १५ जणांचा मृत्यु

File Photo
File Photo

औरंगाबाद - औरंगाबादेत ३६ तासांत कोरोनामुळे तीन जणांचा बळी गेला आहे. रोषनगेट येथील ५० वर्षीय व्यक्तीचा रविवारी (ता. १०) सकाळी आठच्या सुमारास त्यानंतर सोमवारी (ता. ११) पहाटे दीडदरम्यान रामनगर, मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्ण तर सायंकाळी साडेचारच्या सुमारास ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यु झाला. अशी माहिती घाटी रुग्णालयातील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

५८ वर्षीय पुरुष रुग्ण (रा. पुंडलिकनगर) यांची कोवीड चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांच्या फुफुसाचा एक भाग क्षयरोगाच्या शस्त्रक्रियेमुळे काढण्यात आला होता. त्यांना मेंदुचा क्षयरोग, हायड्रोकॅफॅलस मानसिक आजार व झटक्याचा आजार होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना तिव्र झटके आल्याने तसेच कोवीड-१९ या आजाराने दोन्ही फुफुसांच्या न्युमोनियामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण ६४ टक्के इतके कमी झाल्यामुळे त्यांना कृत्रीम श्‍वासोश्‍वास दिला गेला. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  


आतापर्यंत झालेले १४ मृत्यू.. 

  • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
  • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
  • २७ एप्रिलला किलेअर्क येथील ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २८ एप्रिलला किलेअर्क येथील ७७ वर्षीय  महिलेचा मृत्यू 
  • १ मे  गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय  वाहनचालकाचा मृत्यू. 
  • २ मे नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • ३ मे देवळाई येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
  • ५ मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू. 
  • ७ मे आसेफिया कॉलनीतील ९५ वर्षीय महिलेचा मृत्यू. 
  • १० मे रोशनगेट येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
  • ११ मे रामनगर, मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा
  • औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com