esakal | औरंगाबाद: थकबाकी वसुलीचे 'महावितरण'समोर आव्हान । Electricity
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण

औरंगाबाद: थकबाकी वसुलीचे 'महावितरण'समोर आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: महावितरणला दिवसेंदिवस वाढत्या थकबाकीमुळे वीज देखभालीचा खर्च भागवणे अवघड झाले आहे. त्यामुळेच मराठवाड्यात जोरदार वसुली मोहीम सुरु आहे. मराठवाड्यातील तीन हजार कोटीची थकबाकी झाल्याने वसुलीचा भाग म्हणून मराठवाड्यातील तब्बल १६ हजार २६० थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

खर्च भागवणे कठीण

महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, यंत्रसामग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरुस्ती, व्यवस्थापन खर्च, बँकांचे कर्ज व व्याजाची परतफेड आदी खर्चाला सामोरे जावे लागते. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला हा खर्च भागवणेही कठीण होत आहे. त्यामुळेच थकीत वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते आणि संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत.

हेही वाचा: सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

अशी आहे थकबाकी

मराठवाड्यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणी पुरवठा अशा तब्बल १९ लाख १९ हजर ५५२ वीज ग्राहकांकडे तीन हजार ८७०.२५ कोटी रुपये थकबाकी आहे. वारंवार सूचना, पत्रव्यवहार, जनजागृती करूनही वीज बिलाचे पैसे भरण्याकडे काणाडोळा करणाऱ्या १६ हजार २६० वीज ग्राहकांचा महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे.

थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर सदर ग्राहकाने शेजाऱ्यांकडून अथवा चोरून विजेचा वापर सुरु केला का यावर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणने स्वतंत्र पथक नेमली आहेत. ग्राहकांनी जवळच्या महावितरण वीज बिल भरणा केंद्र अथवा ऑनलाइन माध्यमाचा वापर करून सुटीच्या दिवशीही बिलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

हेही वाचा: पुणे : शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार

घरबसल्या भरा वीज बिल

वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशी घरबसल्या मोबाईल वरून, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅश कार्ड तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट क्रमांक टाकून वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असे आहेत थकबाकीदार

  • औरंगाबाद ६६५७

  • लातूर ४०१४

  • नांदेड ५५८९

  • मराठवाडा १६,२६०

- १६ हजारांवर थकबाकीदारांची कापली वीज

- थकबाकीचा डोंगर तीन हजार कोटींच्या पुढे

- घरबसल्या बिल भरण्याची सुविधा

- सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र राहणार सुरू

loading image
go to top