esakal | Corona update : औरंगाबादेत कोरोनाचा हाहाकार सुरूच, आज २०८ बाधितांची भर, मनपा हद्दीतील ११५, ग्रामीणच्या ९३ रुग्णांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

औरंगाबादेत दररोज कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने काढत आहे. आज २०८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये एकूण रुग्णसंख्येची वाटचाल पाच हजाराकडे गेली आहे. आता २२९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Corona update : औरंगाबादेत कोरोनाचा हाहाकार सुरूच, आज २०८ बाधितांची भर, मनपा हद्दीतील ११५, ग्रामीणच्या ९३ रुग्णांचा समावेश

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी २०८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १२२ पुरूष, ८६ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ४९७४ कोरोनाबाधित आढळले असून २४४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २२९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (११५)
रशीदपुरा (२), नारेगाव (१), भारत नगर (७), नारळीबाग (२), बौद्ध विहार (२), हडको एन नऊ (१), शिवशंकर कॉलनी (१) आकाशवाणी परिसर (३), राम नगर, एन दोन (१), जुना मोंढा (१), जटवाडा रोड, हर्सुल (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (७), हनुमान नगर (३), होनाजी नगर (२), जय भवानी नगर (३), इंद्रप्रस्थ सिडको (४), एसटी कॉलनी (५), एन सहा, सिडको (१), एन बारा सिडको (३), एन चार सिडको (१), जटवाडा रोड (१), जाधववाडी (२), चेलिपुरा (१), अंबिका नगर (६), सुरेवाडी (१), गजानन नगर (६), छावणी (१), गवळीपुरा,छावणी (१), न्याय नगर (१), पद्मपुरा (१), न्यू हनुमान नगर (१), जयसिंगपुरा (१), एन चार सिडको (१), शिवाजी नगर (५), ठाकरे नगर (१), गारखेडा (२), बायजीपुरा (३), एन अकरा, सिडको (१), मयूर नगर (२), खोकडपुरा (३), कलाग्राम परिसर (१), मुकुंदवाडी (१), विजय नगर (१), विनायक कॉलनी (१), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (१), सिद्धेश्वर कॉलनी (१), अविष्कार कॉलनी (१),  एन आठ, सिडको (५), माता नगर (२), एन अकरा, हडको (१), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (२), नक्षत्रवाडी (१), मनपा परिसर (२), संजय नगर (१), अन्य (२) 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील रुग्ण (९३)
सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (१०), खुलताबाद (१), दौलताबाद (१), शरणापूर (८), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (२), आंबेडकर चौक, बजाज नगर (३), अयोध्या नगर, मोरे चौक (४), सिडको पंचमुखी महादेव परिसर (१), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (२), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (३), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (२) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (१), सरस्वती सो. (१), न्यू दत्तकृपा सो.(३), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (२), नंदनवन सो. (१) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (५), साऊथ सिटी (२), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (२), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (२), जय हिंद चौक, बजाज नगर (२), बजाज विहार, बजाज नगर (२), मथुरा सो. (१), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (१), त्रिमूर्ती चौक (२), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), बौद्ध विहार, बजाज नगर (२), बजाज नगर (१), गणेश नगर सो. (१), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (१), खुलताबाद रोड, फुलंब्री (१), कन्नड (१), वडनेर, कन्नड (१), नागद, कन्नड (१), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (६), यशवंत नगर, पैठण (१), बोजवारे गल्ली , गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (४), शिवाजी नगर, गंगापूर (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कोरोना मीटर -

  • आतापर्यंतचे बाधित  - ४९७४
  • सुटी झालेले रुग्ण - २४४६
  • उपचार घेणारे रुग्ण - २२९०
  • एकूण मृत्यू             - २३८