esakal | Coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा वेग सुरुच, आज १०२ पॉझिटिव्हची भर, तर १३८० रुग्णांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

 कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात वाढतच चालला आहे. शुक्रवारी (ता.१९) दिवसभरात १२२ रुग्णांचीप वाढ झाली होती. तर शनिवारी (ता.२०) १०२ रुग्णांची आणखी भर पडली आहे.

Coronavirus : औरंगाबादेत रुग्ण वाढीचा वेग सुरुच, आज १०२ पॉझिटिव्हची भर, तर १३८० रुग्णांवर उपचार सुरू

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद :  कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात वाढतच चालला आहे. शुक्रवारी (ता.१९) दिवसभरात १२२ रुग्णांचीप वाढ झाली होती. तर शनिवारी (ता.२०) १०२ रुग्णांची आणखी भर पडली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ३३४० झाली आहे. यापैकी १७८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १३८०  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

या भागातील रुग्णाचा समावेश 
नवजीवन कॉलनी (१), गरम पाणी (१), पडेगाव (१), जाधववाडी (२), राजाबाजार (१), एन नऊ हडको (१), ठाकरे नगर (१), बजाज नगर (१), एन सहा (१), शिवाजी नगर (१), नागेश्वरवाडी (३), शिवशंकर कॉलनी (२), गजानन नगर (२), छत्रपती नगर (१), दर्गा रोड (१), एकता नगर, हर्सुल (१), हनुमान नगर (१), सुरेवाडी (३), टीव्ही सेंटर (१), एन आठ सिडको (१), श्रद्धा कॉलनी (४), एन सहा, सिंहगड कॉलनी (१), आयोध्या नगर (१), बायजीपुरा (३), कोतवालपुरा (१), नारळीबाग (१), अंबिका नगर, मुकुंदवाडी (४), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (१), समता नगर(१),  सिंधी कॉलनी (१),  बजाज नगर (१), जुना मोंढा, भवानी नगर (१), जयसिंगपुरा (२), , सिडको एन अकरा (१),  नेहरू नगर, कटकट गेट (१),

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

न्यू हनुमान नगर (१), विजय नगर, नक्षत्रवाडी (१), भाग्य नगर (४), शिवाजी नगर (१), पदमपुरा (१), उत्तम नगर (२), खोकडपुरा (२), टिळक नगर (१), पिसादेवी (१), बीड बायपास (२), सखी नगर (३), जिल्हा परिषद परिसर (१), सारा गौरव बजाज नगर (३), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (६), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (४),  जय भवानी चौक, बजाज नगर (१), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (३),  दीपज्योती हाऊसिंग  सोसायटी बजाज नगर (१),  दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (१),  देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (२), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), मांडकी (१), पळशी (५), जय हिंद नगरी, पिसादेवी (१), कन्नड (१), मातोश्री नगर, औरंगाबाद (१) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये ४७ स्त्री व ५५ पुरुष आहेत.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

 खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी ५.१५ मंजुरपुऱ्यातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १३१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४७, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
 

loading image