esakal | स्पर्धा परीक्षा होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल, आकाशने गळफास घेऊन केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Youth suicide News

अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असलेल्या आकाशचे आई-वडील मूळगावी शेती करतात. त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही डॉक्टर आहेत.

स्पर्धा परीक्षा होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल, आकाशने गळफास घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने मागील वर्षभरापासून परीक्षाच होत नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.२२) अग्रसेन भवन, सिडको भागात ही घटना उघडकीस आली. आकाश दत्तराव अडकिने (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असलेल्या आकाशचे आई-वडील मूळगावी शेती करतात. त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही डॉक्टर आहेत. भाऊ एमजीएममध्ये डॉक्टर असून वहिनी दंतचिकित्सक आहेत.

ते तिघेजण सिडको भागात राहतात. २० जानेवारीला भाऊ आणि वहिनी मुंबईला गेले. त्यामुळे आकाश एकटाच घरी होता. २१ जानेवारीच्या मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भाऊ आणि वहिनी घरी परतले. तेव्हा आकाश त्याच्या खोलीत झोपलेला असेल, असे समजून त्यांनी त्याला उठविले नाही. परंतु, दररोज सकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान अभ्यासासाठी जाणारा आकाश २२ जानेवारीला सकाळी आठ वाजले तरी उठला नव्हता.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

त्यामुळे डॉक्टर असलेला भाऊ त्याच्या खोलीकडे गेला. त्यांनी दरवाजा वाजविला असता तो केवळ ढकललेला असल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडताच त्यांना आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ त्याला खाली घेऊन घाटीत दाखल केले. तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आकाशचा मृत्यू झाल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिडको ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चांद पठाण करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

loading image