esakal | रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या कृत्याने शेजारी गेले चक्रावून
sakal

बोलून बातमी शोधा

Kavita Trivedi Murder News

रडून रडून या मुलांचे हाल झाले होते. दिवसभरापासून घर उघडले नाही...

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या कृत्याने शेजारी गेले चक्रावून

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : वादात भडकलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात डंबेल्स मारून खून केला. त्यानंतर दोन मुलांना मृतदेहासोबत घरातच कोंडून आरोपी पसार झाला. ही खळबळजनक घटना पिसादेवी परिसरात रुक्मिणी स्क्वेअरमध्ये मंगळवारी (ता.१६) उघडकीस आली. सिद्धेश त्रिवेदी आणि त्याची पत्नी कविता दोन मुलांसह राहतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्या दोघांत वाद झाला. यातून सिद्धेशने आठ किलोचा व्यायामाचा डंबेल्स पत्नी कविताच्या डोक्यात मारला. यात ती जागीच ठार झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला आणि आठ वर्षाचा मुलगा व चार वर्षाच्या मुलीला घरात कोंडून सिद्धेश पसार झाला. ही दोन लहान मुले मंगळवारचा अख्खा दिवस त्यांच्या आईच्या मृतदेहाशेजारीच बसून होती. रडून रडून या मुलांचे हाल झाले होते. दिवसभरापासून घर उघडले नाही, घराला कुलूप आहे आणि आतून रडण्याचा आवाज कसा येतो म्हणून समोर राहणाऱ्यांनी त्यांच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता मुले रडताना दिसली. दार तोडून मुलांना बाहेर काढले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

वाचा : चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने चिकलठाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुलांच्या जबाबावरून कविताची हत्या सिद्धेशने केल्याचे समोर आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image