esakal | चोरट्यांची मजल लय भारी; चक्क 'एटीएस' कार्यालयात केले असे की !
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

दुचाकी चोराचा सुळसुळाट पोलिसांचीच दुचाकी पळवली 
दोन दिवसात चार दुचाकींची चोरी. 

चोरट्यांची मजल लय भारी; चक्क 'एटीएस' कार्यालयात केले असे की !

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी विविध ठिकाणांहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणात गुरुवारी (ता. २७) गुन्हे दाखल करण्यात आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी चोरीमुळे पोलिसांसमोर अव्हान उभे राहिले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पहिली घटना 
सिडको भागातून कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कार्यालयातून पोलिसाचीच दुचाकी चोरुन नेण्यात आली आहे. एटीएसचे पोलिस शिपाई शेख अफसर शेख अकबर (बक्कल क्र. ५७८, रा. पोलिस कॉलनी सिडको) यांनी त्यांची पल्सर दुचाकी (क्र. एमएच २०-सीए-९४७७) ही मंगळवारी (ता. २५) रात्री कार्यालयाच्या आवारात लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दुचाकी चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरी घटना 
दुसरी घटना सिडको, एन-५ भागात घडली. संतोष वैजीनाथ औसेकर (रा. टिव्ही सेंटर, हडको) यांनी २४ आँगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एन-५ भागातील हायटेक इंटरप्राईजेससमोर त्यांची दुचाकी (एमएच-२०-सीजी-१८५४) उभी करुन ठेवली, त्यानंतर ते कामानिमित्त वाळुजला गेले. या काळात चोरट्याने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीसरी घटना 
शेख आमेर शेख जमील (रा. हिनानगर, चिकलठाणा) यांची दुचाकी गुरुवारी (ता. वीस) जालना रोडवरील केंब्रीज चौकात बंद पडली होती. त्यांना गावी जावयाचे असल्याने त्यांनी बंद पडलेली दुचाकी (क्र. एमएच-२०-एके-७६४१) ही जालना रोडवरील एका हॉटेलसमोर उभी करुन ते अन्य वाहनाने गावी गेले. मात्र परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरट्यानी पळवून नेली असल्याचे लक्षात आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
चौथी घटना 
नितीन भागचंद गवांदे (रा. पांघरा, ता. गंगापूर) हे शनिवारी (ता. २२) शेतामध्ये औषध फवारणीसाठी गेले होते.त्यामुळे शेतात जाण्यापुर्वी त्यांनी दुचाकी (क्र. एमएच-२०-इए-४११६) ही शेताच्या बाजूला सावखेडा रस्त्यावर लावली होती. औषध फवारणी करुन परत येईपर्यंत त्यांची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By Pratap Awachar

loading image