esakal | औरंगाबाद: ताजोउद्दीन महाराज यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका । Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद: ताजोउद्दीन महाराज यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका

औरंगाबाद: ताजोउद्दीन महाराज यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनकार ताजोउद्दीन महाराज यांचे सोमवारी (ता. २७) रात्री नंदुरबार येथे कीर्तन चालू असताना हृदयविकाराने निधन झाले. मूळचे बोधलापुरी (ता. घनसावंगी) येथील असलेले ताजोउद्दीन महाराज यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत साधू, संतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा: मित्रा अन्‌ मजिप्रा कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

विजय गवळी, संत साहित्याचे अभ्यासक : ‘तुकाराम महाराज म्हणतात संतांची ते आप्त न होती संत’. तुम्ही संतांचे नातेवाईक आहात म्हणूनच तुम्ही संत होऊ शकता, ही वशिलेबाजी वारकरी संप्रदायात नाही. म्हणूनच हभप. ताजोउद्दीन महाराजांच्या कीर्तनात आलेल्या मृत्यूने समस्त वारकरी संप्रदाय हळहळत आहे.

हभप. अर्जुन पांचाळ महाराज : मुस्लिम समाजातील असूनही आयुष्यभर ब्रम्हचारी राहून त्यांनी कीर्तन भजनातून वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रसार केला. औरंगाबादचेही नावलौकिक केला. त्यांच्यावर मुस्लिम समाजातून बरीच टीका झाली. पण, जातीचा विरोध पत्करून त्यांनी कार्य केले. व्यसनमुक्ती, स्वच्छतेसाठी पुढाकार घेत त्यांनी प्रबोधन केले. सर्व महाराष्ट्र त्यांना ओळखत होता.

हेही वाचा: देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान

बळीराम जोगस महाराज : मुस्लिम समाजातील असूनही वारकरी संप्रदायात मोठी क्रांती करणारे ताजोउद्दीन महाराज होते. पंढरपूरचे महत्त्व ते सातत्याने आपल्या कीर्तनातून अधोरेखित करीत आले. वारकरी संप्रदायाचे उच्चतम ज्ञान प्राप्त करून केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर इतर समाजातही कार्य करण्याची हातोटी व शक्ती त्यांच्यात होती. कोणत्याही धर्माचा त्यांनी कधीही अपप्रचार केला नाही. धर्म बदलत नसतो, समाज बदलत नसतो फक्त कार्य बदलते हे ते नेहमी सांगत.

हभप. हरिदास जोगदंड (अध्यक्ष वारकरी मंडळ, बीड) : ताजोउद्दीन महाराज वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन महाराष्ट्राला सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी दिली. माझ्यावरती त्यांचे बंधुवत प्रेम होते. श्रीक्षेत्र वाणगाव फाटा येथे ते आवर्जून कीर्तनसेवेसाठी येत असत. बीड येथील खटोड महोत्सवात त्यांच्या कीर्तनामध्ये मी विणाची सेवा केली होती. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे खूप मोठी हानी झाली.

हभप. मनीषा ज्ञानेश्वर महाराज बिडाईत : जन्माने मुस्लिम परंतु तत्त्वाने हिंदू धर्म स्वीकारलेले वारकरी संप्रदायातील क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून हभप. ताजोउद्दीन महाराज शेख यांचे कार्य फार मोठे होते. ते वारकऱ्यांचे खरे श्रद्धाभूषण होते. धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता अत्यंत निष्ठेने वारकरी संप्रदायाचे कार्य त्यांनी केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

loading image
go to top