Corona Vaccinate | औरंगाबाद जिल्ह्यात १५ टक्केच विद्यार्थ्यांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination of students
औरंगाबाद जिल्ह्यात १५ टक्केच विद्यार्थ्यांचे लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यात १५ टक्केच विद्यार्थ्यांचे लसीकरण

औरंगाबाद : जिल्ह्यात तीन जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील बालकांचे लसीकरण (Corona Vaccinate) सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून १२ दिवस होवून गेल्यानंतर केवळ १५ टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत (ता.१४) जिल्ह्यातील एकूण २ लाख ६४ हजार ५२१ मुलांपैकी केवळ ४० हजार १८४ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख २४ हजार ३३७ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.(Vaccination of students)

हेही वाचा: Corona Update | नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील सुमारे २ लाख ६४ हजार ५२१ बालके असून शुक्रवारी (ता.१४) मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ ४० हजार १८४ बालकांचे लसीकरण झाले आहे. अद्याप २ लाख २४ हजार ३३७ विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. या बालकांचे दोन्ही मात्रांचे लसीकरण फेब्रुवारीपर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे; परंतु त्या तुलनेत लसीकरणाने अजूनही वेग घेतलेला दिसत नाही.

त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सर्व किशोरवयीन मुलामुलींचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दहावी-बारावी परीक्षेच्या अनुषंगाने मंडळाने तातडीने विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु काही शाळा आणि महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे आव्हान कायम आहे.

हेही वाचा: जळगावकरांची कोरोना चाचणीकडे पाठ; शहरात वाढताय सुपर स्प्रेडर

जिल्ह्यातील इयत्तानिहाय विद्यार्थी

 • नववी : ७६,२७२

 • दहावी : ७४,३१४

 • अकरावी : ५७,१५५

 • बारावी : ५६,७७०

तालुकानिहाय लसीकरण :

तालुका - लसीकरण झालेले विद्यार्थी

 • औरंगाबाद - ५२०८

 • गंगापूर - १५६०

 • कन्नड - ८२५०

 • खुलताबाद - ०

 • पैठण - ६०७२

 • फुलंब्री - ३३५७

 • सिल्लोड - ३००१

 • सोयगाव - ८९३

 • युआरसी-१ - ४९८६

 • युआरसी-२ - ४१५८

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top