esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील गावकरी लय भारी! कोरोनाला रोखले वेशीवरच
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुधानोरा (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद)

औरंगाबाद जिल्ह्यातील गावकरी लय भारी! कोरोनाला रोखले वेशीवरच

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदुरवादा (जि.औरंगाबाद) : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील गावे, वाड्यावस्त्या देखील कवेत घेतल्या. अनेकांचा उपचारादरम्यान बळी गेला. मात्र गंगापुर तालुक्यातील ईसरवाडी ते बिडकीन Bidkin महामार्गावर असलेल्या गुरुधानोरा (ता.गंगापूर) Gangapur ग्रुप ग्रामपंचायतीने कोरोनाची पहिली व दुसरी लाट वेशी बाहेरच रोखण्यात यश मिळवले. गावात एकही रुग्ण सापडला नसून आता ग्रामस्थ तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर ही बाधित आढळू लागले. त्यामुळे तालुका महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची Gurudhanora Grampanchayat चांगलीच धावपळ उडालेली पाहावयास मिळाली. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत शिक्षण विभागाची जबाबदारी वाढली होती. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. aurangabad district's gurudhanora villagers prevent corona at border

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

त्या अनुषंगाने गुरुधानोरा, माळवाडी, भगतवडी या ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले. ग्रामपंचायतीने लोकसहभागातून नियमित स्वच्छता औषध फवारणी, जलशुद्धीकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा बाहेरून आलेल्या व्यक्तींची विलगीकरण आदी उपाययोजना काटेकोरपणे पालन केले. हातावर पोट असलेल्यांना किराणा साहित्याचे Grocery Goods वाटप केली. आरोग्य विभागाने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. लक्षण असलेल्यांना विलगीकरण ठेवून उपचार करण्यात आली. त्यामुळे शेजारील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दोन्ही लाटांमध्ये गुरुधानोरा येथील संख्या शून्यच राहिल.

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

पोलिसांचे नेहमीच मार्गदर्शन

शेंदुरवादा परिसरातील अनेक गावे ही वाळूज पोलिस ठाण्याअंतर्गत येतात. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाय-योजना करत युवकांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन कार्यक्रम हाती घेतल्याने त्याचा परिणाम या परिसरात चांगलाच जाणवत आहे.

हेही वाचा: देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपची चाचपणी, कराडांचा दौरा

ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणे सामाजिक अंतर वैयक्तिक स्वच्छता ठेवणे. लक्षणे दिसताच तपासणी करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करीत प्रशासनास सहकार्य केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त राहिले.

- दिलीप (भाऊ) साळवे, सरपंच

हे गाव ग्रामीण भागात असल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध हवा व ग्रामपंचायतीने विविध उपाय-योजना करत अत्यल्पदरामध्ये जलशुद्धी बसवल्याने शुद्ध पाणी मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून आला.

संभाजी बनकर, ग्रामविकास आधिकारी

loading image