esakal | देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपची चाचपणी, कराडांचा दौरा
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपची चाचपणी, कराडांचा दौरा

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची Deglur-Biloli Assembly By Election रणधुमाळी आता सुरू झाली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने यश संपादन केल्यामुळे भाजपच्या BJP आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार देगलूर - बिलोली पोटनिवडणुकीत कसा विजयी होईल, याची रणनिती आखली जात आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष Nanded आणि पोटनिवडणुक प्रभारी डॉ. भागवत कराड MP Bhagwat Karad यांनी शनिवारी (ता. तीन) नांदेडला मुक्कामी दौरा करत नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते जाणून घेतली. डॉ. कराड यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची त्यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.bjp planning for deglur biloli assembly by poll nanded news

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

या वेळी भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, नांदेडचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर आदी उपस्थित होते. देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड आदी तालुक्यात खतगावकर यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासोबत डॉ. कराड यांची जवळपास तासभर चर्चा झाली. या मतदारसंघातून श्री. खतगावकर हे तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या विकासकामांचा भाजपला फायदा होणार आहे.

हेही वाचा: वाळूज औद्योगिक परिसरात वीज उपकेंद्रात स्फोट, लाखोंचे नुकसान

जिल्हाध्यक्ष गोजेगावकर म्हणाले की, श्री. खतगावकर यांनी ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली तोच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे ही निवडणुक श्री. खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत डॉ. कराड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची मुंबई येथे पोटनिवडणुकीसंबंधी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top