महत्त्वाची बातमी : स्वच्छ सर्व्हेक्षणात औरंगाबाद राज्यात आठव्या स्थानावर, तर देशात..

Aurangabad mahapalika.jpg
Aurangabad mahapalika.jpg

औरंगाबाद :  कचरा कोंडीमुळे नाचक्की झालेल्या औरंगाबाद शहराने यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणात समाधानकारक मजल मारली आहे. गेल्यावर्षी ४६ व्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादचा यंदा देशपातळीवर २६ वा क्रमांक आला आहे. राज्यपातळीवर मात्र आठवा क्रमांक आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काम अपूर्ण असल्याचा फटका मात्र रॅंकींगमध्ये बसला आहे. 

शहरातील कचराकोंडी तीन वर्षांपूर्वी गाजली होती. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे केंद्र सरकारच्या हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराला समाधानकारक रॅकिंग मिळेल अशी अपेक्षा होती. फेब्रुवारी २०२० मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणासंदर्भात केंद्र सरकारच्या पथकाने शहरात येऊन तीन दिवस पाहणी केली होती. त्याचे निकाल गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आला.

यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, दहा लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात औरंगाबादचा क्रमांक २६ वा आला आहे. दहा लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांची संख्या ४७ आहे. गतवर्षी झालेल्या सर्वेक्षणात औरंगाबादचा क्रमांक ४६ वा तर सर्वसाधारण रॅंकिंगमधये २२० वा क्रमांक होता. त्यामुळे यंदाचे रँकिंग समाधानकारक म्हणावे लागेल. स्वच्छ सर्वेक्षण सहा हजार गुणांसाठी करण्यात आले होते, त्यापैकी तीन हजार ७३० गुण औरंगाबादला मिळाले आहेत. 

पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येणार 
घनकचरा व्यवस्थापनाची सध्या कामे सुरू आहेत. त्यामुळे यंदा थोडा फटका बसला. पुढील वर्षी ही कामे पूर्ण होतील. त्यामुळे पहिल्या दहा मध्ये आपल्या शहराचा क्रमांक लागेल असा विश्वास श्री. भोंबे यांनी व्यक्त केला. यंदा शासनाने सर्वसाधारण रँकिंग शासनाने जाहीर केलेले नाही. हे रँकिंग जाहीर झाले तरी औरंगाबादचा क्रमांक पहिल्या सत्तर शहरात येईल असे भोंबे म्हणाले. 

औरंगाबादचे आत्तापर्यंतचे क्रमांक 

  • २०१७ -२९९ 
  • २०१८ -१२८ 
  • २०१९- २२० 
  • २०२० -०२६ 

प्रमुख शहरांचे गुण 

  • नवी मुंबई – ५४६७.८९ 
  • नाशिक – ४७२९.४६ 
  • ठाणे – ४६०६.३५ 
  • पुणे – ४४७७.३१ 
  • नागपूर – ४३४५.०६ 
  • कल्याण डोंबिवली – ४०९१.०० 
  • पिंप्री चिंचवड – ३९४५.१० 
  • औरंगाबाद – ३७२९.६३ 
  • वसई विरार – ३२६८.३७ 
  • मुंबई (ग्रेटर मुंबई) – ३१०६.३९

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com