esakal | नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

ashok bhavle

शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.१४) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : यंदा वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, बँकेचे व पिक लागवडीसाठी उसनवारीने घेतलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आडुळ येथील ५८ वर्षीय शेतकऱ्याने स्वत:च्या आत्महत्या केली आहे. शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.१४) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

अशोक गोविंदराव भावले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक भावले यांची आडुळ बु. गावालगत गट क्रमांक २५९ मध्ये १ हेक्टर ३२ आर क्षेञ जमीन आहे. यावर आडुळ येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे थकित कर्ज होते. या थकित कर्जाचा अद्यापपर्यंत त्यांना त्याचा लाभ मिळाला नव्हता तसेच या वर्षी वारंवार झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले होते. झालेला खर्च ही शेतीच्या उत्पन्नातून निघाला नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने ते सतत चिंताग्रस्त राहात होते.

जालन्यात साहित्यिकांचे अनोखे आंदोलन

सध्यास्थितीत अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान झाल्यानंतर कपाशी उपटून गहू पिकाची पेरणी केली होती. परंतु त्यावर ही निसर्ग कोपल्याने तांबोरा रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने वाया जाण्याची भिती आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या या शेतकरयांने आज सोमवारी सकाळी टोकाची भूमिका घेऊन त्यांच्या स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गावगाड्याचे राजकारण आता तापणार; बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

आज सकाळी शेतात जाणाऱ्या इतर मजुरांना रस्त्याकडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला अशोक भावले या शेतकरयाचे प्रेत लटकलेले आढळुन आले. आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र क्षिरसागर, विश्वजित धन्वे तपास करीत आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image