फुलंब्री पंचायत समिती
फुलंब्री पंचायत समितीSakal

फुलंब्रीत प्रशासकीय मान्यता नसतांना कार्यरंभ आदेश निघाला कसा..?

फुलंब्री पंचायत समितीतील रोहयो विभागातील सावळा गोंधळ

फुलंब्री : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेतकऱ्यांच्या हिताच्या मोठ्या प्रमाणात विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. आता प्रशासकीय मान्यता नसतांना वैयक्तिक सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेश निघालाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करत मग्रारोहयोची नियमावली धाब्यावर बसवून प्रशासकीय मान्यतेच्या तब्बल दीड महिना अगोदरच कार्यारंभ आदेश दिल्याचा प्रकार फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयात उघडकीस आला आहे.

त्यामुळे ‘आले अधिकाऱ्यांच्या मना तेथे काही कुणाचे चालेना’ असा प्रत्यय वैयक्तिक लाभाच्या योजनेत दिसून आला आहे. तालुक्यात सुमारे ९३ गावे असून, ७१ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामे केली जातात. शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला मोठे विशेष अधिकार देऊन गावाच्या विकासाला चालना दिली आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हिताच्या योजनेतील शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. फुलंब्री तालुक्यातील गेवराई येथे पाच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहीर योजनेत प्रशासकीय मान्यता नसतांना गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्यारंभ आदेश दिले.

फुलंब्री पंचायत समिती
महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पंकजा मुंडेंपेक्षा 'या' नेत्या वरचढ

तर सदरील पाचही शेतकऱ्यांचे नवीन प्रस्ताव असून, केवळ संकेतांक जनरेट केलेला २५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिसून आले. प्रशासकीय मान्यता नसतानाच कार्यारंभ आदेश हा दीड महिना अगोदरच देण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांच्या संचिका दाखल झाल्यानंतर तांत्रिक सहाय्यक अंदाज पत्रक तयार करणे आवश्यक होते. त्यानंतर अंदाज पत्रकास सिंचन विभागाचे उपअभियंता यांनी तांत्रिक मान्यता देणे आवश्यक होते. तांत्रिक मान्यतेनंतर गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात.

प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यारंभ आदेश दिल्या जातो. मात्र येथील पंचायत समितीत हे सर्व नियम धाब्यावर बसवून दाखल असलेल्या संचिकेस डायरेक्ट गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अशा किती संचिकांना प्रशासकीय मान्यता नसतांना कार्यारंभ आदेश दिले हे समोर येईल. सदरील शेतकऱ्यांच्या प्रशासकीय मान्यताच उपलब्ध नाही. याविषयी तुम्ही गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून घ्या, असा सल्ला सहायक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय खटावकर यांनी दिला.

फुलंब्री पंचायत समिती
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयात रोजगार हमी योजनेत सुरू असलेल्या कामाची माहिती तुमच्याकडूनच मिळाली आहे. सध्या मी राज्यात दौऱ्यावर आहे. या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल.

-संदीपान भुमरे, मंत्री, रोजगार हमी योजना

मग्रारोहयो विभागातून नियमित संचिका समोर येतात. संचिका प्राप्त झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येतो. सदरील प्रकार घडला नसावा, घडला असेल तर संबंधित विभागातून माहिती घेतली जाईल.

-विलास गंगावणे, गटविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com